Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आता मी बोलणारच नाही - सलमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 11:06 IST

‘सुल्तान’ चित्रपटाची शुटिंग करताना मला ‘बलात्कारित’ महिलेसारखे वाटायचे, असे बेताल वक्तव्य करणाºया सल्लूमियांने आता न बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे....

‘सुल्तान’ चित्रपटाची शुटिंग करताना मला ‘बलात्कारित’ महिलेसारखे वाटायचे, असे बेताल वक्तव्य करणाºया सल्लूमियांने आता न बोलण्याचा निर्णय घेतलेला आहे.आयफा अ‍ॅवार्डच्या निमित्ताने बोलत असताना तो म्हणाला की,  मी आता जास्त बोलणारच नाही. जो पर्यंत मला खात्री पटणार नाही की, मी जे बोलतोय ते बरोबर आहे, तो पर्यंत मी माझे तोंड उडणार नाही.‘बलात्कारा’ची तुलना सलमानच्या चांगलीच अंगलट आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगनाने त्याला जाहिर माफी मागण्याची मागणी केली आहे. तरी अद्याप सलमानने माफी मागितलेली नाहीए.सलमानचे वडिल सलीम खान यांनी मात्र वाद निवाळण्यासाठी मुलातर्फे दिलगीरी व्यक्त करून माफी मागलेली आहे.सलमानच्या अशा वागण्यामुळे आता हा वाद आणखी किती वाढतो हे सांगता येत नाही.