Join us

सिनेमात नावाची खिल्ली उडवल्यामुळे पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 14:52 IST

'ग्रेट ग्रँड मस्ती' सिनेमात आपल्या नावाची खिल्ली उडवण्यात आलीय.त्यामुळे अभिनेता शायनी अहुजाने  बालाजी मोशन पिक्चर्स आणि मारुती इंटरनॅशनल यांना ...

'ग्रेट ग्रँड मस्ती' सिनेमात आपल्या नावाची खिल्ली उडवण्यात आलीय.त्यामुळे अभिनेता शायनी अहुजाने  बालाजी मोशन पिक्चर्स आणि मारुती इंटरनॅशनल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सिनेमात मोलकरणीच्या पात्राला शायनी नाव देण्यात आल्याने शायनी अहुजाने नाराजी व्यक्त केली आहे. एकता कपूर, जितेंद्र, इंद्रकुमार यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून आपलं नाव वापरण्यात आलेली दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत तसेच  माझी माफी मागावी अशी मागणी शायनी अहुजाने केली आहे. शायनी अहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2011 मध्ये न्यायालयाने त्याला 7 वर्षांची शिक्षादेखील सुनावली होती.