‘ही’ जलपरी कुणी दुसरी नव्हे, तर माहिरा खान आहे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST
पाकिस्तानी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर चेहरा म्हणजे माहिरा खान. होय, बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याची जादू उधळून चुकलेल्या माहिराने अलीकडे एका फॅशन ब्रॅण्डसाठी केलेले फोटोशूट केले. तिचे हे फोटोशूट तुम्ही बघायलाच हवे.
‘ही’ जलपरी कुणी दुसरी नव्हे, तर माहिरा खान आहे!!
पाकिस्तानी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर चेहरा म्हणजे माहिरा खान. होय, बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याची जादू उधळून चुकलेल्या माहिराने अलीकडे एका फॅशन ब्रॅण्डसाठी केलेले फोटोशूट केले. तिचे हे फोटोशूट तुम्ही बघायलाच हवे.बीचवर लेहंगा घालून केलेले फोटोशूट जबरदस्त आणि हटके असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तुम्हीही ते बघायलाच हवे. निळ्याशार समुद्रात आणि सूर्याच्या प्रकाशात माहिरा अगदी जलपरी दिसतेय. बिकनी नाही तर लेहंगा घालून केलेले माहिराचे हे हटके फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. यंदा आलेल्या ‘रईस’ या चित्रपटात माहिरा दिसली होती. यातील माहिराच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. ‘रईस’मध्ये तिला शाहरूख खानच्या अपोझिट संधी मिळाली होती. अर्थात पाकिस्तानी कलाकारांवर भारतात लादलेल्या बंदीमुळे तिला या चित्रपटाचे भारतात प्रमोशन करता आले नव्हते. ‘रईस’मध्ये तिला शाहरूख खानच्या अपोझिट संधी मिळाली होती. अर्थात पाकिस्तानी कलाकारांवर भारतात लादलेल्या बंदीमुळे तिला या चित्रपटाचे भारतात प्रमोशन करता आले नव्हते.