Join us

मॉम ऐश्वर्याप्रमाणे अभिनेत्री नाही तर देशाची पंतप्रधान होणार आराध्या बच्चन! ज्योतिष्याची भविष्यवाणी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 20:35 IST

अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन कुठले करिअर निवडेल, हे ...

अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन कुठले करिअर निवडेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. आपल्या घरातील अभिनयाचा वारसाचं ती पुढे नेईल, असेच सगळ्यांचे मत पडेल. मात्र कदाचित आराध्याच्या नशिबात काही वेगळचं लिहून ठेवलय.  हैदराबादेतील डी ज्ञानेश्वर नामक एका ज्योतिषाने आराध्याबद्दल वेगळेच भाकित वर्तवले आहे. होय, आजी-आजोबा किंवा आई-वडिल यांच्या मार्गावर न जाता आराध्या वेगळ्याचं वाटेने जाईल, असा या ज्योतिष्याचा दावा आहे. त्यांच्या दाव्यानुसार, आराध्या अभिनयात नाही तर राजकारणात नाव कमवेल. देशाच्या राजकारणात ती एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल. कदाचित पंतप्रधान बनेल. आराध्या हे नाव बदलून रोहिणी हे नाव धारण केल्यास तिला राजकारणात अधिक फायदा होऊ शकतो.यापूर्वी डी ज्ञानेश्वर यांनी तेलगू सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दलही अचूक भविष्यवाणी केली होती. रजनीकांत राजकारणात येणार, असे भाकित त्यांनी वर्तवले आहे. त्याचे भाकित काळाच्या कसोटीवर एकदम खरे उतरले आहे. टाईम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गत रविवारी डी ज्ञानेश्वर यांनी वेगवेगळी भाकित वर्तवलीत. त्यात रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनणार, अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दुसºयांदा राष्ट्राध्यक्ष होणार, भारत व पाकिस्तानात युद्ध होणार आणि येत्या लोकसभा निवडणुकीत नरेन्द्र मोदींचा विजय होणार, अशा भाकितांचा समावेश आहे. यातील एक भाकित आराध्याबद्दलही होते.  डी ज्ञानेश्वर यांनी रजनीकांतबद्दल वर्तवलेली एक भविष्यवाणी खरी ठरली. आता आराध्याबद्दलची त्यांचे भाकित किती खरे ठरते, हे तर काळचं ठरवेल.ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चन, मानधनात थोडी कपात करशील का?तूर्तास आराध्या बॉलिवूडच्या सुपरक्यूट स्टार किड्सच्या यादीत सामील आहे. करिना कपूरचा मुलगा तैमूर आणि शाहरूख खानचा मुलगा अबराम यांच्यााआधी आराध्या बच्चन मीडिया व चाहत्यांचा पहिला क्रश होती. अलीकडे आराध्या आई ऐश्वर्यासोबतकान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिसली होती़ येथील लोभस अदांनी सगळ्यांची मने जिंकली होती.