Join us

सलमानच नव्हे तर ‘हा’ अभिनेताही ऐश्वर्या रायच्या निळ्या डोळ्यांवर आहे फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 20:27 IST

ऐश्वर्या राय-बच्चनने आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला. १९९४ मध्ये जेव्हा ऐशने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावे केला ...

ऐश्वर्या राय-बच्चनने आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा केला. १९९४ मध्ये जेव्हा ऐशने मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावे केला होता तेव्हापासून बॉलिवूडमध्ये तिच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. तिच्या सुंदरतेचे किस्से केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान तिच्या प्रेमात अक्षरश: वेडापिसा झाला होता. आजही तो ऐशला विसरू शकला नाही. कारण ऐश्वर्याशी ब्रेकअप झाल्यानंतर सलमान अजूनपर्यंत लग्न करू शकला नाही. परंतु एकमेव सलमानच तिच्यावर जीव ओवाळणारा नसून, इंडस्ट्रीमधील आणखी एक असा स्टार आहे, जो तिच्या सौंदर्यावर व निळ्या डोळ्यांवर आजही फिदा आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून, अक्षय खन्ना आहे. अक्षय सध्या त्याच्या आगामी ‘इत्तेफाक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा बघावयास मिळणार आहे. या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाला भलेही प्रमोट केले जात नसले तरी, निर्मात्यांनी चित्रपटातील स्टार्ससोबत एक व्हिडीओ मुलाखत शूट केली आहे ज्यामध्ये हे तिन्ही स्टार चित्रपटाबद्दल सांगताना दिसत आहेत. या मुलाखतीदरम्यान जेव्हा अक्षयला, तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते असे विचारण्यात आले तेव्हा त्याने एक क्षणाचाही विचार न करता सौंदर्यवती ऐश्वर्या रायचे नाव घेतले. अक्षयने म्हटले की, ‘मी जेव्हा केव्हा ऐश्वर्याला भेटतो तेव्हा मी तिच्या सौंदर्यात हरवून जातो. अक्षय आणि ऐशने ‘ताल’ आणि ‘आ अब लौट चले’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोन्ही चित्रपटात त्यांची केमिस्ट्री बघण्यासारखी होती. शिवाय प्रेक्षकांनाही ती भावली होती. अक्षयच नव्हे सोनाक्षीनेदेखील ऐश्वर्याच्या सौंदर्यावर मी फिदा असल्याचे सांगितले. मला तिचे डोळे खूपच आवडतात. ती खूपच स्टनिंग आहे. खरं तर माजी जगत्सुंदरी असलेल्या ऐश्वर्याचे सौंदर्य आजही मोहीत करणारे आहे.