Join us

रिया चक्रवर्तीच नाहीतर वयाने लहान असलेल्या इतरही अभिनेत्रींसह महेश भट्टची होती जवळीक, फोटो पाहून तुम्हालाही येईल याची प्रचिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 15:50 IST

महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल.

गेल्या काही दिवसांपासून महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या फोटोंमुळे नेटीझन्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कमी वयाच्या मुलींबरोबर महेश भट्ट यांची जवळीक का असते? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवार राहणार नाही. कारण फक्त रिया चक्रवर्तीच नाहीतर इतरही अभिनेत्रींबरोबर महेश भट्टची मैत्री असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

या फोटोंमध्ये जिया खानसह महेश भट्टचा फोटो पाहून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. धक्कादायक म्हणजे जिया खान आत्महत्या करण्यापूर्वी महेश भट्ट यांच्याकडे काम मागण्यासाठी गेली होती.मात्र त्यावेळी महेश भट्ट यांच्याकडे कोणतेही काम नव्हते म्हणून ते तिची मदत करू शकले नाही.  'द डार्क साइड ऑफ लाइफ: मुंबई सिटी' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान खुद्द महेश भट्ट यांनीच ही गोष्ट सांगितली होती.त्याच्या काही दिवसांनंतर जिया खानच्या मृत्यूची बातमी आली. जिया खाननेही नैराश्यामुळे आत्मत्या केल्याचे  ऐकताच धक्का बसला होता असेही महेश भट्ट यांनी सांगितले होते.

महेश भट यांनी २० व्या वर्षीच लॉरेन ब्राइटशी लग्न केल होतं. लग्नानंतर काही दिवसांनी लॉरेननं आपलं नाव बदलून किरण भट असं केलं. या दोघांना २ मुलं आहेत. पुजा आणि राहुल. मात्र लॉरेन आणि महेश यांचं हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. याला कारण होतं महेश यांचं परवीन बॉबी यांच्याशी असलेलं अफेअर. मात्र परवीन यांच्या आजारपणामुळे महेश तिच्यापासून वेगळे झाले. आणि आपल्या पत्नीकडे परत आले.

तसेच पुजा भट्टसह केलेल्या किसींगमुळेही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. लोकांनी त्यांच्यावर भारतीय सभ्यता खराब केल्याचा आणि समाजत चुकीचा संदेश पोहोचवत असल्याचा आरोप लावला. त्यावेळी त्या फोटोवरून प्रचंड वाद झाला आणि महेस भट यांच्यावर प्रचंड टीका झाली.

टॅग्स :महेश भटरिया चक्रवर्ती