अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले. १९ वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. पण कदाचित मलायकाआधी अरबाज खान हाच लग्न करून मोकळा होणार, असे दिसतेय.
मलायका अरोरापूर्वी अरबाज खानचे होणार ‘दोनाचे चार हात’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 15:50 IST
मलायका व अर्जुन लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. पण कदाचित मलायकाआधी अरबाज खान हाच लग्न करून मोकळा होणार, असे दिसतेय.
मलायका अरोरापूर्वी अरबाज खानचे होणार ‘दोनाचे चार हात’!!
ठळक मुद्देजॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे.