Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग खान किंवा दबंग खान  नाही तर या अभिनेत्यासोबत झळकायचंय सारा अली खानला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 06:00 IST

सारा अली खानचा हा अभिनेता बालपणी होता क्रश

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशनने गतवर्षी ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सुपरहिट सिनेमांसह बॉक्स ऑफिसवर धमाकेदार वापसी केली. त्याआधी दीर्घकाळ हृतिक रूपेरी पडद्यापासून दूर होता. ‘सुपर 30’ व ‘वॉर’ या सिनेमांच्या बॉक्स ऑफिसवर हीट ठरले.त्याने आपल्या डान्स व एक्शनने सर्वांनाच चांगली भुरळ पाडली आहे. त्यामुळे तो तरूणींना खूपच भावतो. नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये अभिनेत्री सारा अली खानने देखील हे स्वीकार केले की तिला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल.आपला पहिला चित्रपट केदारनाथ पासूनच, सारा अली खानने एक सक्षम अभिनेत्रींच्या रूपात सिद्ध केले आहे. ती नेहमीच चांगल्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे.

नुकतेच, अभिनेत्रीने ऋतिक रोशन बाबत आपले विचार मांडताना सांगितले की "ऋतिक रोशन मला प्रेरित करतात. मला त्यांचे बरेचसे काम आवडते. जर मला तुम्ही जोधा अकबर आणि धूम 2 मध्ये एक निवडायला सांगितलेत तर मी नाही निवडू शकणार. मला वाटते की ऋतिक सर माझ्यासाठी धूम 2 सारखेच अद्भुत आहेत." पुढे ती असे ही म्हणाली की, ऋतिक रोशन यांच्यासोबत काम करायला मला नक्कीच आनंद वाटेल. आपल्या लहानपणीच्या 'क्रश'बद्दल बोलताना सारा ने खुलासा केला की धूम 2 मधील ऋतिकची व्यक्तिरेखा ही त्यांच्या लहानपणीचा 'क्रश' होती. 

टॅग्स :सारा अली खानहृतिक रोशन