Join us
Daily Top 2Weekly Top 5

​दिशा पटनी नव्हे, भारताची पेनेलोप क्रूज म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2017 16:02 IST

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या जाम खूश आहे. खूश का नसणार, स्वत:ची तुलना एका  हॉलिवूडच्या सौंदर्यवतीशी केली जावी, हे ...

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनी सध्या जाम खूश आहे. खूश का नसणार, स्वत:ची तुलना एका  हॉलिवूडच्या सौंदर्यवतीशी केली जावी, हे कुणाला आवडणार नाही. होय, दिशाची तुलना हॉलिवूड अभिनेत्री पेनेलोप क्रूजशी केली जात आहे. विशेष म्हणजे नेटिजन्सचे हे म्हणणे आहे. दिशा आणि पेनेलोप या दोघींमध्ये बरेच साम्य आहे, असे नेटिजन्सचे मत आहे. केवळ इतकेच कमी की काय म्हणून नेटिजन्सनी दिशाला भारताची पेनेलोप क्रूज असा किताब दिला आहे. कदाचित नेटिजन्सच्या या प्रतिक्रिया पाहून अलीकडे दिशालाही तसेच वाटू लागले आहे. दिशानेही पेनेलोपचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे दिशाची आयडल पेनेलोपचं आहे, असे म्हणायला हरकत नाही.२०१५ मध्ये एका कॅडबरीच्या जाहिरातीत दिशा झळकली. यानंतर पुढच्याच वर्षी एका तेलगू सिनेमात तिची वर्णी लागली.  ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट दिसली होती. तिच्या यातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. यानंतर   इंटरनॅशनल मेगास्टार जॅकी चॅनच्या चित्रपटाची लॉटरी दिशाला लागली. जॅकीच्या ‘कुंग फू योगा’मध्ये दिशाची वर्णी लागली. लवकरच दिशा ‘बागी2’मध्ये दिसणार अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या दिशा व टायगर श्रॉफच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. दिशा व टायगर अनेकदा एकत्र दिसतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहे. अर्थात दोघांनीही अद्याप हे मान्य केलेले नाही.