Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आलिया नाही; जान्हवी करणार वरूणसोबत रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:32 IST

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, वरूण धवन लीड रोलमध्ये ...

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सूक असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, वरूण धवन लीड रोलमध्ये असलेल्या ‘सिद्दत’मधून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. करण जोहर निर्मित आणि ‘2 स्टेट्स’फेम अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘सिद्दत’साठी आधी आलिया भट्टचे नाव चर्चेत होते. पण आता यात आलिया नाही तर जान्हवीची वर्णी लागू शकते. आता यामागचे कारण अद्याप कळलेले नाही. पण सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर २०१७ मध्ये हा चित्रपट फ्लोरवर येऊ शकतो. गेल्या बºयाच दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होतेय. निश्चितपणे जान्हवीची एन्ट्री ग्रँड होणार. करण जोहर निर्मित, अभिषेक वर्मन दिग्दर्शित आणि वरूण धवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘सिद्दत’पेक्षा अधिक ‘ग्रँड’ जान्हवीसाठी काय असू शकेल? होय ना!