नव्या नंदा ही इतर स्टारकिडसप्रमाणे अभिनय क्षेत्राकडे वळली नसून तिने करिअरसाठी वेगळाच पर्याय निवडला आहे. नव्या नंदा तिच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. समाजहितासाठी ती आता काम करणार आहे. महिला सक्षमीकरण यावर ती अनेकदा बोलताना दिसते. त्यामुळे तिच्या या नव्या प्रोजेक्टमधून ती विविध मुद्यांवर काम करत नवीन बदल घडवण्याचा ती प्रयत्न करणार आहे.
आजोबा अमिताभ बच्चन यांनीही नव्याची कामगिरी पाहून मला तुझाल अभिमान वाटतो अशा शब्दांत नव्याचे कौतुक केले आहेत. अमिताभ बच्चन यांचे हे ट्टिट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून युजर्सनी यावर बरीच कमेंट्स देखील केली आहेत. अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त अभिषेक बच्चननेही नव्बा नंदाबद्दल एक पोस्ट केले आहे. भरभरून कौतुक करताना दिसतोय.
अभिषेक बच्चन म्हणायला अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत आहे. पण या अनेक वर्षांत यशाने त्याला कायम हुलकावणी दिली. फ्लॉपचा शिक्का माथी बसलेला अभिषेक यावरून अनेकदा ट्रोल झाला. आजही कधी कामावरून तर कधी अभिनयावरून त्याला ट्रोल केले जाते. आता मात्र ट्रोलर्सनी अमिताभ यांची लेक श्वेता बच्चन हिला ट्रोल केले. श्वेताची मुलगी नव्या नवेली नंदा हिने एक पोस्ट केली आणि या पोस्टवरून एका महिला युजरने नव्याची आई श्वेताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
अमिताभ बच्चन यांच्या मुलीचे नाव श्वेता असून ती प्रसिद्ध बिझनेसमॅन निखिल नंदा यांची पत्नी आहे. निखिल नंदा भारतातील एक यशस्वी उद्योगपती आहेत. २२ वर्षा अगोदर १६ फेब्रुवारी १९९७ रोजी श्वेता बच्चन हिचे निखिल नंदा सोबत लग्न झाले होते. निखिल नंदा हे हिंदी चित्रपटसृष्टीचे लोकप्रिय अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांची मुलगी रितू नंदा आणि राजन नंदा यांचा मुलगा आहे.
निखिल बिग बींपेक्षा खूप श्रीमंत आहे. अमिताभ बच्चन २८०० कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक आहेत. तर रिपोर्ट्सनुसार त्यांचे जावई निखिल नंदा यांची संपत्ती जवळपास ३५०० कोटी रुपये इतकी आहे. निखिल नंदा ह्यांचे नाव मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन मध्ये घेतले जाते.