Join us

नोरा फतेही पूर्ण केला २० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा, वाळवंटातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 15:47 IST

नुकतेच नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर २० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. याच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. 

बॉलिवूडची टॉप डान्सर नोरा फतेही सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. ती नेहमीच आपल्या डान्सने आणि फोटोंमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही मोठी आहे. ती तिच्या व्हेकेशनचे फोटो, डान्स व्हिडीओ आणि म्युझिक व्हिडीओ फॅन्ससाठी शेअर करत असते. नुकतेच तिचे इन्स्टाग्रामवर २० मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. याच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. 

नोरा फतेहीने व्हिडीओ पोस्ट करून फॅन्सला सपोर्टसाठी धन्यवाद दिले आहेत. पोस्टच्या कॅप्शनला लिहिले आहे की, 'वाह, आपण करून दाखवलं. माझी इन्स्टा फॅमिली आणि ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केलं आहे त्यांना थॅंक यू. लव्ह यू गाइज ही तर बस सुरूवात आहे. 

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा रेमो डिसुझाच्या 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमात दिसली होती. त्यात ती वरूण धवन आणि श्रद्धा कपूरसोबत दिसली होती. तसेच नुकतंच तिचं गुरू रंधावासोबतचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही रिलीज झालं आहे. या गाण्याला रेकॉर्ड ब्रेक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ती अजय देवगनच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे. तर इतरही काही सिनेमांमध्ये ती आपल्या बहारदार डान्सने सर्वांचं मनोरंजन करणार आहे. 

टॅग्स :नोरा फतेहीबॉलिवूडसोशल मीडिया