इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे संपूर्ण जग हादरले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने सर्वोच्च नेता अयातुल्लाह अली खामेनेई यांना मारल्याने खवळलेल्या इराणने तीव्र प्रहार सुरू केला असून तणाव वाढला आहे. अनेक देशांनी अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी इराणशी एकता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे अनेक देशांनी सावधगिरीने पावले टाकत आहेत. ते देश तटस्थ विधाने देत आहेत. या संघर्षाचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे, ज्यात विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे हजारो भारतीय प्रवासी आखाती देशांत अडकले आहेत. अशातच आता अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) हिने एक भावुक व्हिडीओ शेअर करत जागतिक शांततेचे आवाहन केले आहे.
नोरा फतेही बहुतेक वेळा दुबईमध्ये वास्तव्यास असते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिच्या चाहत्यांमध्ये तिच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. यावर नोराने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून आपले अपडेट दिले आहे. तिने स्पष्ट केले की ती सध्या दुबईमध्ये नसून सुरक्षित आहे. या व्हिडिओमध्ये नोराने केवळ स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल माहिती दिली नाही, तर सुरू असलेल्या संघर्षाबद्दलही तीव्र चिंता व्यक्त केली.
नोरा म्हणाली, "जे काही घडतंय, ते पाहून मी आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले आहे. सोशल मीडियावर समोर येणारे विध्वंसाचे व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आहे. मला खूप भीती वाटतेय, कारण कोणत्याही निष्पाप नागरिकाने आपला जीव गमावू नये, अशी माझी प्रार्थना आहे".
नोरा पुढे म्हणाली, "दरवर्षी जगात कुठेतरी युद्ध होतं, नरसंहार होतो. आता खऱ्या अर्थाने 'पुरे झाले' असं म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्येक व्यक्तीला शांततेत जगण्याचा हक्क आहे, पण दुर्दैवाने आपण आज अनिश्चितता आणि भीतीच्या वातावरणात जगत आहोत. उद्या काय होईल, याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे". नोराने आपल्या चाहत्यांना आणि सर्वांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत देवावर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
दुबईत भारतीय कलाकारांची कोंडीयापूर्वी अभिनेत्री सोनल चौहानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विट करत दुबईतून बाहेर काढण्यासाठी मदतीची याचना केली होती. ईशा गुप्ता, अजित कुमार आणि विष्णू मंचू यांसारखे मोठे कलाकारही या संघर्षात अडकल्याची माहिती समोर आली आहे. दुबई विमानतळावरील हल्ल्यामुळे विमान उड्डाणे रद्द झाल्याने अनेक भारतीयांचे परतीचे मार्ग बंद झाले आहेत.
Web Summary : Amidst the escalating Israel-Iran conflict, Nora Fatehi shared a video expressing deep concern. She highlighted the fear and uncertainty, appealing for peace and safety for everyone. She is safe and not currently in Dubai. Many Indians are stuck in gulf countries.
Web Summary : इज़राइल-ईरान संघर्ष के बीच नोरा फतेही ने चिंता व्यक्त करते हुए एक वीडियो साझा किया। उन्होंने डर और अनिश्चितता पर प्रकाश डाला, सभी के लिए शांति और सुरक्षा की अपील की। वह सुरक्षित है और वर्तमान में दुबई में नहीं है। कई भारतीय खाड़ी देशों में फंसे हुए हैं।