Join us
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील शब्द, बोल्ड स्टेप्सचा भडीमार; नोरा फतेही-संजय दत्तचं गाणं प्रदर्शित होताच ट्रोल, ओलांडल्या सगळ्या मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 15:07 IST

गाण्याचे लिरिक्स आणि हुक स्टेप्समुळे नोरा फतेहीचं हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही सेलिब्रिटींनीही 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर आक्षेप घेतला आहे. 

नोरा फतेही आणि संजय दत्त त्यांच्या 'केडी द डेविल' सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. हे गाणं प्रदर्शित होताच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. गाण्याचे लिरिक्स आणि हुक स्टेप्समुळे नोरा फतेहीचं हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी गाण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही सेलिब्रिटींनीही 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यावर आक्षेप घेतला आहे. 

'केडी द डेव्हिल' या सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणं दोन दिवसांपूर्वी १५ मार्चला प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात नोरा फतेहीने तिचा जलवा दाखवला. काही तासांमध्ये या गाण्याला युट्यूबल लाखो व्ह्यूज मिळाले. मात्र या गाण्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. अश्लील शब्द आणि बोल्ड स्टेप्सचा भडिमार असलेलं हे गाणं चाहत्यांना रुचलेलं नाही. अश्लीलतेमुळे या गाण्याला विरोध होताना दिसत आहे. हे गाणं बॅन करण्याची मागणीही होत आहे. मोठा वाद झाल्यानंतर निर्मात्यांनी केडी द डेव्हिल सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके'  हे गाणं युट्यूबवरुन काढून टाकलं आहे. 

'सरके चुनर तेरी सरके'  गाण्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्तलाही चाहत्यांनी ट्रोल केलं आहे. 'केडी द डेव्हिल' हा एक कन्नड अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. १९७० मधील बंगळुरूमधल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. तर संजय दत्त, शिल्पा शेट्टी, नोरा फतेही यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. ३० एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nora Fatehi & Sanjay Dutt's Song Trolled for Vulgarity, Bold Steps

Web Summary : Nora Fatehi and Sanjay Dutt's song 'Sarke Chunariya' from 'KD - The Devil' faces backlash for vulgar lyrics and bold steps. The song was removed from YouTube after heavy criticism. The film is set to release on April 30.
टॅग्स :नोरा फतेहीसंजय दत्त