Join us

वाढदिनी सोनाक्षीने पोस्ट केला ’नूर’चा टीजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 18:52 IST

वाढदिवसानिमित्ताने सोनाक्षी सिन्हाने तिच्या ‘नूर’ या चित्रपटाचा टीजर इन्स्टाग्रामवर ‘आय एम नूर’ या नावाने शेअर केला आहे. या चित्रपटात ...

वाढदिवसानिमित्ताने सोनाक्षी सिन्हाने तिच्या ‘नूर’ या चित्रपटाचा टीजर इन्स्टाग्रामवर ‘आय एम नूर’ या नावाने शेअर केला आहे. या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे.सोनाक्षी म्हणते, नूरची भूमिका करताना मी खूपच उत्सुक आहे. सुनील सिप्पी यांच्या मार्गदर्शनाखाली ही भूमिका करताना मी खूप काळ थांबू शकत नाही. नूर म्हणजे वादग्रस्ततेचे मोहोळ आहे. ती म्हणजे प्रत्येक मुलगी. ती मीच आहे. प्रत्येक जणांना आवडेल असे हे पात्र आहे.’ पाकिस्तानी पत्रकार सबा इम्तियाज यांनी लिहिलेल्या कराची, यु आर किलींग मी या विख्यात कादंबरीवर आधारित ‘नूर’ हा चित्रपट आहे. ‘खºया आयुष्यात संघर्ष करणाºया प्रत्येकाचे प्रतिनिधीत्व सोनाक्षी करते. असुरक्षिततेच्या वातावरणात धाडसाने पुढे येणारी ती अभिनेत्री असल्याचे सुनील सिप्पी यांनी सांगितले.