चित्रपटसृष्टीत अशा कित्येक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी सिनेजगताला एक नवी ओळख दिली. जुन्या काळात अशा कित्येक अभिनेत्री होत्या ज्या काळानुसार गायब झाल्या. एक अशीच अभिनेत्री व गायिका आहे जी आपल्या अभिनय व गायन कौशल्यासोबतच लव्ह लाईफमुळे चर्चेत आली होती. या प्रसिद्ध गायिका व अभिनेत्रीचं नाव आहे नूरजहां.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात अभिनय व गायन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नूरजहां १९४७ नंतर पाकिस्तानात गेली. तिथे त्यांनी गायन क्षेत्रातून पुन्हा आपल्या करियरची सुरूवात केली. गायन व अभिनयाव्यतिरिक्त नूरजहां त्यांच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होत्या. एका मुलाखतीत नूरजहां यांना त्यांचे किती बॉयफ्रेंड होते, असे विचारले असता त्यांनी मोजायला सुरूवात केली आणि पाहता पाहता हा आकडा १६ पर्यंत गेला.