Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणाला डोनेट केले बिग बीने ५१ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 22:07 IST

बॉलिवूचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली विद्यापीठातील आपल्या कॉलेजच्या सभागृहाच्या बांधकामासाठी ५१ लाख रुपये दान केले आहेत. दिग्दर्शक सतीश ...

बॉलिवूचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्ली विद्यापीठातील आपल्या कॉलेजच्या सभागृहाच्या बांधकामासाठी ५१ लाख रुपये दान केले आहेत. दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी अमिताभ बच्चन यांनी ही राशी दान केल्याचा खुलासा केला आहे. मागील काही महिन्यापासून किरोरी मल कॉलेजच्या मोडकळीस आलेल्या सभागृहाच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्यासाठी येथील सतीश कौशिक  व प्राध्यापक प्रयत्न करीत होते. अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या किरोरी मल महाविद्यालयातून (केएमसी)आपले शिक्षण पूर्ण केले आहे. केएमसी थेअटर सोसायटीमध्ये घडलेले अनेक अभिनेते आज बॉलिवूडमध्ये यशस्वी ठरले आहेत. मात्र मागील काही काळापासून केएमसीच्या आॅडिटोरिअमची दूरवस्था झाली होती. मागील सप्टेंबर महिन्यात सतीश कौशिक यांनी आपल्या महाविद्यालयाला भेट दिल्यावर केएमसी आॅडिटोरिअमची झालेली दूरवस्था त्यांच्या लक्षात आली. तेव्हापासून या आॅडिटोरिअमच्या उभारणीसाठी त्यांनी येथील प्राध्यापकांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू केले होते. केएमसीचे प्रभारी प्राचार्य दिनेश खट्टर यांनी सतीश कौशिक यांच्या माध्यमातून या महाविद्यालयाचे अ‍ॅल्मुनी असलेले अमिताभ बच्चन, सुशांत सिंग आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर, हबीब फैजल आणि विजय कृष्णा आचार्य यांची मुंबईत भेट घेतली. दिनेश खट्टर यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने केएमसीच्या आॅडिटोरिअमची खालावली अवस्था या कलावंतांना सांगितली. या सर्व कालावंतानी फ्रँ क ठाकूरदास मेमोरिअल आॅडीटोरिअमच्या जिर्नोधारासाठी निधी देण्याचे कबुल केले आहे. आपल्या महाविद्यालयातील आॅडिटोरिअमच्या निर्मितीसाठी अमिताभ बच्चन यांनी ५१ लाख रुपयांचे दान देण्याचे जाहीर केले असून याशिवाय याच महाविद्यालयातून घडलेले अन्य कलावंतांनीही आपल्या वतीने दान दिले आहे अशी घोषणा सतीश कौशिक यांनी केली मुंबईत केली.