श्रुती नसणार'हेराफेरी ३'चा हिस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:59 IST
नीरज व्होरा यांच्या 'हेराफेरी ३' साठी अभिनेत्री श्रुती हसन हिची निवड करण्यात आली होती. पण, तिने इतर प्रोजेक्टसाठी दिलेल्या ...
श्रुती नसणार'हेराफेरी ३'चा हिस्सा
नीरज व्होरा यांच्या 'हेराफेरी ३' साठी अभिनेत्री श्रुती हसन हिची निवड करण्यात आली होती. पण, तिने इतर प्रोजेक्टसाठी दिलेल्या कबुलीमुळे ती आता चित्रपटाचा भाग नसणार आहे. तिने दोन दाक्षिणेकडील चित्रपट साईन केले असून काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याचीही क बुली तिने दिली आहे. त्यामुळे हेराफेरीच्या तिसर्या सिक्वेलचा ती भाग नसणार, अशी माहिती मिळाली आहे. या पार्टमध्येही परेश रावल, सुनील शेट्टी, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, इशा गुप्ता आणि नेहा शर्मा असणार आहे. निशिकांत कमलचा रॉकी हँडसम आणि तिगमांशु धुलिया सोबतचा यारा हे हिंदी तसेच पुली, वेदालम, सिंघम ३ यांसारखे तामिळ चित्रपटात ती काम करणार आहे.