Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कोणताही पश्चाताप नाही...', रॅपर-गायक बादशाहनं पत्नी जॅस्मिनसोबतच्या घटस्फोटावर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 11:13 IST

Badshah : सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह अनेकदा आपल्या गाण्यांमुळे चर्चेत येतो. बादशाहने जॅस्मीनसोबतच्या नात्यात काय चूक झाली आणि ते का वेगळे झाले हे सांगितले. आपल्या मुलीसोबतच्या नात्याबद्दलही तो बोलला.

सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह (rapper-singer Badshah) अनेकदा आपल्या गाण्यांमुळे चर्चेत येतो. त्याच्या काही हिट गाण्यांमध्ये गेंदा फूल, सनक, बझ, जुगनू आणि डीजे वाले बाबू यांचा समावेश आहे. बादशाह आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खासगी ठेवतो आणि त्याबद्दल प्रसिद्धीझोतात येणे त्याला आवडत नाही. तथापि, बादशाहचे पहिले लग्न जॅस्मिन मसीह सोबत झाले होते.त्यांना एक मुलगी आहे जिचे नाव जेसी ग्रेस मसिह सिंग आहे. मात्र, २०२० मध्ये बादशाह आणि जॅस्मिन वेगळे झाले. नुकतेच बादशाहने जॅस्मीनसोबतच्या नात्यात काय चूक झाली आणि ते का वेगळे झाले हे सांगितले. आपल्या मुलीसोबतच्या नात्याबद्दलही तो बोलला.

अलिकडेच, बादशाह पॉडकास्ट, प्रखर के प्रवचनवर दिसला. यादरम्यान रॅपर-गायकाने खुलासा केला की त्याने आणि त्याची एक्स पत्नी जॅस्मिनने त्यांच्या नात्यासाठी सर्व काही दिले आणि ते वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बादशाह म्हणाला, "जर पत्नीपासून वेगळे होण्याची गोष्ट असेल तर मला कोणताही पश्चात्ताप नाही, कारण आम्ही दोघांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि आम्ही वेगळे झालो कारण ते आमच्या मुलासाठी हेल्दी नव्हते. मी माझ्या मुलीला भेटतो पण खूप वेळा नाही कारण ती लंडनमध्ये राहते.

बादशाहचे असे आहे आपल्या मुलीशी नाते बादशाहने त्याच्या मुलीसोबतच्या नात्याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, तो त्याच्या मुलीशी खूप मैत्रीपूर्ण आहे आणि त्याच्या मुलीला वाटते की तिचे वडील खूप मस्त आहेत. बादशाह म्हणाला, "ती माझ्या कॉन्सर्टमध्ये होती, माझे बाबा मस्त आहेत. ते खूप छान आहेत. पण ती माझी फॅन नाही. ती ब्लॅकपिंक ऐकते. संगीतकार असल्याने तुमच्या मुलासाठी दुसऱ्या संगीतकाराचे सामान विकत घेणे थोडे कष्टदायक आहे." 

बादशाह पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चादरम्यान, बादशाह सध्या पाकिस्तानी अभिनेत्री हानिया अमीरला डेट करत असल्याची चर्चा आहे. बादशाहा तिचा चांगला मित्र असल्याचे अभिनेत्रीने एकदा सांगितले होते. तो एक अतिशय वास्तविक आणि साधा माणूस आहे आणि म्हणूनच आम्ही चांगले मित्र आहोत.

टॅग्स :बादशहा