Join us

बाबो..! कुणालाच माहित नव्हते की सुशांतच्या आयुष्यात होती आणखीन एक मुलगी, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:41 IST

ईडीच्या चौकशीत समोर आली धक्कादायक बाब. सुशांत सिंग राजपूत एका घराचे भाडे देत होता. या फ्लॅटमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड राहते आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता रिया चक्रवर्तीनंतर आता आणखीन एका एक्स गर्लफ्रेंडचा उल्लेख समोर आला आहे. ईडीच्या तपासात समोर आले आहे की सुशांत सिंग राजपूत एका फ्लॅटचे भाडे भरत होता. या फ्लॅटमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड राहते आहे. पण सुशांतची एक्स गर्लफ्रेंड कोण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. अशात रिया चक्रवर्तीअंकिता लोखंडे नंतर आता तिसरी गर्लफ्रेंड कोण हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक झाले आहेत.

ईडी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीमधील तथ्य जाणून घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हा फ्लॅट सुशांत सिंग राजपूतच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे आणि ज्या बँक खात्यातून सुशांत सिंग राजपूत त्याचे हफ्ते भरत होता त्या खात्यात जवळपास 35 लाख रुपये रक्कम असल्याचे समजते.

रिया व तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून जप्त केलेले मोबाइल, लॅपटॉपच्या तपासणीतून त्याबाबत माहिती घेतली जात आहे, असे ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार संशयितांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ईडीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत यांच्यासह सहा जणांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या १० दिवसांमध्ये त्यांच्या चौकशीच्या अनेक फेºया झाल्या आहेत. त्यांचे सुशांतशी संबंध, अर्थपूर्ण व्यवहार, भागीदारीबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे.

दरम्यान आता आम्हाला काही जणांकडून धमक्या मिळत आहेत तसेच आमची प्रतिमा मलिन करण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा आरोप आत्महत्या केलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या कुटुंबीयांनी नऊ पानी निवेदनात केला आहे. सुशांत सिंगच्या आत्महत्येचा मुंबई पोलिसांनी सखोल तपास न करता काही प्रतिष्ठित लोकांना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीअंकिता लोखंडे