‘नूर’चे ‘उफ ये नूर’ गाणे आऊट...पाहा, सोनाक्षी सिन्हाचा वेंधळा अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 14:23 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा ‘नूर’ पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. होय, सोनाक्षीचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या नूर सिनेमातील ‘उफ ये नूर’ हे गाणे आज रिलीज झाले.
‘नूर’चे ‘उफ ये नूर’ गाणे आऊट...पाहा, सोनाक्षी सिन्हाचा वेंधळा अवतार!
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा ‘नूर’ पाहण्यास आपण सगळेच उत्सूक आहोत. होय, सोनाक्षीचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या नूर सिनेमातील ‘उफ ये नूर’ हे गाणे आज रिलीज झाले. या गाण्यात सोनाक्षीची अनेक रूपं बघायला मिळत आहेत. पर्सनल व प्रोफेशनल लाईफदरम्यानचा नूरचा संघर्ष या गाण्यात पाहायला मिळतोय. नूर गोंधळलेली आहे, स्वप्नं बघतेय. या गाण्यात नूरच्या स्वभावाचा प्रत्येक पैलू दिसतो आहे. तिचा वेंधळेपणा पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. मनोज मुंतजिर यांनी लिहिलेले हे गाणे गायले आहे, अमाल मलिक आणि अरमान मलिक यांनी. सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा येत्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यात सोनाक्षी एका पत्रकाराच्या भूमिकेत आहे. सोनाक्षी एक पत्रकार म्हणून काम करत असताना, तिचे आयुष्य कसे चाललेय हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तिच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे ‘उफ ये नूर’ या गाण्यात उमटलं आहे. अलीकडे ‘नूर’चे ट्रेलर लॉन्च झाले होते. दोन मिनिटे २१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सोनाक्षी वेंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसतेय. जी एक जर्नालिस्ट असते, परंतु स्वत:ला जोकर जर्नालिस्ट म्हणत असते. ट्रेलरमधील ‘नूर’ तिच्या वाटेत आलेल्या प्रत्येक वस्तूला धडकते. थोडक्यात त्या वस्तूची नासधूस करते. त्यामुळे तिला स्वत:च्या आयुष्याचा तिरस्कार वाटतो. अतिशय खोळकर नूर चक्क सनी लिओनीचा इंटरव्ह्यू करण्यासाठी धडपड करीत असते. मात्र ट्रेलरच्या अखेरीस तिच्या आयुष्यात बराचसा बदल झाल्याचे दिसून येते. ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.ALSO READ : Trailer Launch : वेंधळ्या ‘नूर’चा पहा हटके अंदाज...