NO bikini; सारा अली खानला आई अमृताने बजावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 14:16 IST
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना, सध्या ...
NO bikini; सारा अली खानला आई अमृताने बजावले!
अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान हिच्या बॉलिवूड डेब्यूकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना, सध्या एक हॉट बातमी आहे. सारा लवकरच ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा असतानाच ही हॉट बातमी येऊन धडकली आहे. बातमी आहे,साराच्या बिकनी सीनबाबत. होय, ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मध्ये सारा बिकनीमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. पण साराची आई अमृता हिचा याला जोरदार विरोध आहे. साराने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात बिकनी सीन्सपासून करू नये, असे अमृताचे स्पष्ट मत आहे. त्यामुळेच अमृताने साराला अगदी स्पष्ट ताकिद दिल्याचे कळतेय. ALSO READ : सारा अली खान पहिल्याच चित्रपटात देणार तीन बिकिनी सीन्स!! ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मधून अभिनेत्री आलिया भट्टने बॉलिवूड डेब्यू केले होते. यात आलियानेही बिकनी सीन दिला होता. ‘स्टुडंट आॅफ दी ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणाºया सारालाही बिकनी सीन देण्यास सांगितले गेले. तेही एक नाही तर तीन-तीन. पण ही गोष्ट अमृताच्या कानावर जाताच, तिने यावर जोरदार आक्षेप घेतला. तू तुझ्या डेब्यूची सुरुवात बिकनी सीनने करायची नाही, असे तिने साराला स्पष्ट सांगितले. अमृताने कधीही कुठल्या सिनेमात बिकनी सीन दिलेला नाही. सारानेही आपल्याच वाटेने जावे, असे अमृताला वाटतेय. विशेष म्हणजे, आईचा हा पावित्रा बघून, सारानेही माघार घेतली आहे. आता करण जोहर हे बिकनी सीन्स हटवण्याची तयारी चालवली आहे. याचमुळे चित्रपटाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडल्याचेही कळतेय. एकंदर काय, तर यामुळेच साराचा डेब्यू लांबला आहे. आता तो कुठपर्यंत लांबतो ते आपण बघूच!