Join us
Daily Top 2Weekly Top 5

​१०० कोटींच्या घरावरून निरूपा रॉयच्या मुलांमध्ये हाणामारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:31 IST

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री निरूपा रॉय आज आपल्यात नाहीत. पण सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे. ...

बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री निरूपा रॉय आज आपल्यात नाहीत. पण सध्या त्यांचे नाव चर्चेत आले आहे. होय, निरूपा राय यांच्या दोन मुलांमध्ये सध्या संपत्तीवरून पुन्हा जुंपली आहे.  नेपियन सी रोड वरील घराच्या मालकी हक्कावरून निरूपा राय यांची दोन्ही मुले किरण व योगेश यांच्यातील वादात विकोपाला गेलाय. इतका की काल हे प्रकरण हाणामारीपर्यंत आले. अखेर पोलिसांना याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला.मालाबार हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, निरूपा यांचा लहान मुलगा किरण याने काल रात्री ११ वाजता कंट्रोल रूमला फोन करून मोठ्या भावाविरोधात तक्रार केली. मोठ्या भावाने नशेत आपल्यासोबत मारहाण केल्याचे त्याने कंट्रोल रूमला कळवले. यासंदर्भात किरणने सांगितले की, योगेश काल रात्री दारूच्या नशेत माझ्या अपार्टमेंटमध्ये शिरला. त्याने माझ्या घराच्या खिडकीची तावदाने फोडलीत. घरातील सदस्यांना शिवीगाळ केली. माझ्या पत्नीला धक्का देत मारहाण केली. माझी मुले प्रचंड घाबरली. योगेश इतका आक्रमक झाला होतो की आम्ही सगळ्यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. २० मिनिटांपर्यंत त्याने धिंगाणा घातला आणि नंतर तिथून निघून गेला.दरम्यान योगेशने या आरोपांचे खंडन केले आहे. मी नाही तर किरणनेच मला मॅसेज पाठवून डिवचले. किरणने अपार्टमेंटचे सगळे लाईट्स सुरु ठेवले होते. तिन्ही एसी सुरु होते. कारण त्याला विजेचे बिल भरावे लागत नाही. मी त्याच्या पत्नीला कुठलीही मारहाण केलेली नाही, असे योगेश म्हणाला.निरूपा रॉय यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती कमल रॉय या संपत्तीचे मालक झाले होते. पण कमल रॉयच्या निधनानंतर या संपत्तीवरून किरण व योगेश यांच्यात वाद सुरु झाला. २०१६ मध्ये किरणने न्यायालयात याचिका दाखल कर, हे घर हडपण्यासाठी आपला भाऊ आपल्याला धमकी देत असल्याचा आरोप केला होता. या घराची किंमत जवळपास १०० कोटी रूपये असल्याचे कळते. निरूपा रॉय अनेक चित्रपटात आईच्या भूमिकेत दिसल्या. अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत तर प्रेक्षकांना त्यांना अनेक चित्रपटात पाहायला मिळाले आहे. ‘मेरे पास माँ हे’ हा दीवार चित्रपटातील शशी कपूर यांचा संवाद प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अमिताभ आणि शशी कपूर यांच्या आईची भूमिका निरूपा रॉय यांनीच साकारली होती.