Join us

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आहे बॉलिवूडमधून गायब, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 06:00 IST

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने बॉलिवूडला अलविदा केले आहे आणि ती भारत सोडून परदेशात स्थायिक झाली आहे.

नव्वदच्या दशकातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीने बॉलिवूडला अलविदा केले आहे आणि ती भारत सोडून परदेशात स्थायिक झाली आहे.. ती सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी मिनाक्षीने ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.मिनाक्षी शेषाद्रीने एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत तिने आता आणि तेव्हाचा लूक दाखवला होता. एक फोटो खूप जूना होता तर दुसरा फोटो आताचा होता. दोन्ही फोटोत मिनाक्षीने एकसारखी पोझ दिली होती.

५७ वर्षीय मिनाक्षीच्या लूक्समध्ये खूप बदल झाला आहे. इंस्टाग्रामवर ती नेहमी फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. यात ती आधीच्या फोटोशूटसारखी पोझ देताना दिसते आहे.

मिनाक्षी आपल्या पती आणि मुलांसोबत अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहते आहे.

लॉकडाउनदरम्यान एक व्हिडीओ तिने शेअर केली होती ज्यात ती आपल्या घराच्या किचनमध्ये होती आणि जेवण बनवत होती. मिनाक्षीने संपूर्ण लॉकडाउन घरीच व्यतित केला. यादरम्यान तिने कुकिंगमध्ये स्वतःला बिझी ठेवले. नवीन नवीन पदार्थ बनविले.

मिनाक्षीने आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमविले आहे. मात्र इतकी प्रसिद्ध मिळाल्यानंतर तिने अचानक सिनेइंडस्ट्रीला अलविदा केले.

तिचा पहिला चित्रपट पेंटर बाबू होता. मात्र हिरो चित्रपटातील तिचे काम प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटात तिच्यासोबत जॅकी श्रॉफ होता. याशिवाय मिनाक्षीचा दामिनी चित्रपटदेखील प्रेक्षकांना भावला होता.

टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री