Join us

नीना गुप्ताने म्हटले, ‘जेव्हा अविवाहित होती तेव्हा पुरुषमंडळी पार्टीत बोलवायचे अन् आता...?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 19:20 IST

अभिनेत्री नीना गुप्ताचे आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. विदेशी क्रिकेटपटूसोबत अफेअर, लग्न न करताच ...

अभिनेत्री नीना गुप्ताचे आयुष्य एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. विदेशी क्रिकेटपटूसोबत अफेअर, लग्न न करताच आई होणे, एकटीनेच मुलीचा सांभाळ करणे आणि त्यानंतर करिअरमधील चढ-उतार पार करून पुन्हा एकदा आयुष्याच्या त्याच वळणावर पोहोचणे अशा सर्व घडामोडी तिच्या आयुष्यात घडल्या. सध्या ती तिच्या आयुष्यात आनंदी असून, विवाहित जीवन जगत आहे. सध्या नीनाकडे चांगल्या प्रोजेक्ट्सच्या आॅफरदेखील आहेत. परंतु अशातही एक शल्य तिला सातत्याने बोचत असल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. नुकतीच नीना गुप्ता कान्स फिल्म फेस्टिव्हल २०१८ मधून परतली आहे. कान्समध्ये तिचा ‘द लास्ट कलर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला गेला. काही महिन्यांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून काम मागितले होते. पुढे बघता-बघता तिला पाच चित्रपटांच्या आॅफर्सही मिळाल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ताने आयुष्यातील एक खंत बोलून दाखविली. आपला वाइट काळ आठवताना नीनाने सांगितले की, आपल्या समाजाचे विचार अजूनही जुनाटच आहेत. कारण जी महिला अविवाहित असते किंवा तिचा घटस्फोट झालेला असतो तेव्हा ती एकटी म्हणून लोक तिच्याशी संपर्क साधणे पसंत करतात. नीनाने सांगितले की, जेव्हा मी सिंगल जीवन जगत होती, तेव्हा लोक मला पार्ट्यांमध्ये आवर्जून आमंत्रित करायचे. लग्नानंतर मला याबाबत कोणीही विचारत नव्हते. दरम्यान, २००८ मध्ये नीना गुप्ताने विवेक मेहरा याच्याशी लग्न केले. या अगोदर तिचे माजी क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांच्याशी अफेअर होते. मात्र या दोघांचे लग्न  होऊ शकले नाही. मात्र त्यांची एक मुलगी आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना आणि रिर्चड्स यांची मुलगी आहे. नीना गुप्तानेच मसाबाचे पालनपोषण केले. मुलीविषयी नीना गुप्ताने सांगितले की, मला गर्व वाटतो जेव्हा लोक मला मसाबा गुप्ताची आई म्हणून संबोधतात. नीना गुप्ता लवकरच ‘वीरे दी वेडिंग, मुल्क, बधाई होत, संदीप और पिंकी फरार’ आणि ‘द लास्ट कलर’ या चित्रपटांमध्ये बघावयास मिळणार आहेत.