Join us

भट्ट गर्ल्सचे नाईट आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 17:35 IST

नाईट आऊट, हा बी-टाऊनमधील सेलिब्रिटींचा परवलीचा शब्द..  दिवसभराचा कामाचा ताण घालवण्या अनेक सेलिब्रिटी नाईट आऊटींगला निघतात. काल रात्री भट्ट ...

नाईट आऊट, हा बी-टाऊनमधील सेलिब्रिटींचा परवलीचा शब्द..  दिवसभराचा कामाचा ताण घालवण्या अनेक सेलिब्रिटी नाईट आऊटींगला निघतात. काल रात्री भट्ट गर्ल्सही नाईट आऊटला निघाल्या. आता या भट्ट गर्ल्स म्हणजे कोण, प्रश्न पडला असेल ना! अहो, आपली क्यूट आलिया, तिची बहीण शाहीन भट्ट आणि या दोघींची आई सोनी रझदान. शाहीनने या तिघींची एक क्यूट सेल्फि सोशल मीडियावर शेअर केली. यात आलिया व शाहीन तर सोडा त्यांची मम्मीही जाम क्यूट दिसतेयं...आहे ना, इंटरेस्टिंग... आलियाचा ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ नुकताच प्रदर्शित झाला. सध्या आलियाकडे अनेक चांगले सिनेमे आहेत. यात ‘उडता पंजाब’,‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ अशा अनेक चिद्धपटात आलिया दिसणार आहे.