रात्री हेल्मेट घालून झोप! सचिन तेंडुलकरने लग्नबेडीत अडकलेल्या विराट कोहलीला दिली टिप्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:11 IST
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे काल सोमवारी इटलीत विवाहबद्ध झालेत. हे लग्न ...
रात्री हेल्मेट घालून झोप! सचिन तेंडुलकरने लग्नबेडीत अडकलेल्या विराट कोहलीला दिली टिप्स!!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे काल सोमवारी इटलीत विवाहबद्ध झालेत. हे लग्न अतिशय सीक्रेट ठेवले गेले होते. त्यामुळे लग्न होईपर्यंत केवळ या लग्नाची चर्चा तितकी होती. प्रत्यक्षात विरूष्काने लग्नाची घोषणा केली आणि यानंतर विरूष्कावर शुभेच्छांचा जणू पाऊस पडला. यात सर्वाधिक खास ठरला तो ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकर याने विरूष्काला दिलेला शुभेच्छा संदेश. आम्ही एकमेकांना सदैव प्रेम बंधनात राहण्याचे वचन दिले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाने हा दिवस आणखीच खास होईल. आमच्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल धन्यवाद, असे tweet करत  सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास विरूष्काने लग्न झाल्याचे जाहिर केले. यानंतर रात्री १० वाजून ११ मिनिटाला सचिनने सोशल मीडियावरून विराटला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘अभिनंदन विराट, वैवाहिक जीवन आनंदमयी ठरो,’ असे सचिनने लिहिले. विराटनेही लगेच सचिनच्या या शुभेच्छांच्या स्वीकार केला. शिवाय काही टिप्स? असा खट्याळ प्रश्नही त्याने सचिनला विचारला. मग काय,या प्रश्नावर सचिनने विराटची चांगलीच ‘विकेट’ घेतली.  ‘रात्री हेल्मेट घालून झोप,’ असा सल्ला सचिनने विराटला दिला. आता सचिनचा हा सल्ला ऐकून विराट व अनुष्काची काय स्थिती झाली असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. विराट व अनुष्का दोघेही सचिनचे हे tweet वाचून पोट धरून हसत सुटले असणार...