Nick Jonas Sister Death: हॉलिवूड अभिनेता आणि प्रियांका चोप्राचा पती असलेल्या निक जोनासच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. निकची मानलेली बहीण माया किबेल हिचं निधन झालं आहे. ती फक्त ३० वर्षांची होती. गेल्या काही वर्षांपासून ती एका दुर्लभ आजाराचा सामना करत होती. मायाची आई कियोको किबेल यांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे. माया ही जोनस ब्रदर्सची लहानपणीची मैत्रीण आणि शेजारी आहे. तिच्या निधनाने जोनस कुटुंबीयही दु:खात आहेत.
मायाचे काही फोटो तिच्या आईने शेअर केले आहेत. पोस्टमध्ये त्या म्हणतात, "हे दु:खद बातमी देताना मला अतीव दु:ख होत आहे. माया ही विल्सन नावाच्या दुर्लभ आजाराने ग्रस्त होती. तिने खूप प्रयत्न केले पण शेवटी तिच्या शरीराने साथ दिली नाही. ७ मार्चला सकाळी ती बेशुद्ध झाली होती. तिचं हृदय आणि फुप्फुसाने काम करणं बंद केलं. आयसीयुमध्ये तिचं निधन झालं. तिला इतका त्रास होत होता की रडत रडतच ती कधीकधी झोपी जायची. पण आता ती स्वर्गात गेली आहे. तिथे ती तिच्या वडिलांसोबत कुठलाही त्रास न होता न रडता राहील. जे लोक मायाला जवळून ओळखत होते त्यांना या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण जाईल. पण, ती जिथे कुठे असेल तिथून आपल्या सगळ्यांना पाहत असेल".
या पोस्टवर कमेंट करत निक जोनासने बहिणीच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. "तू कायम माझी बहीण राहशील आणि मी नेहमी तुझ्यासोबत असेन", असं म्हणत त्याने श्रद्धांजली अर्पण केली आहे. जोनास कुटुंब आणि माया यांचं लहानपणापासूनत अगदी जवळचं नातं होतं. माया ही जोनास कुटुंबाचाच एक भाग होती. मायाच्या सोशल मीडियावरुन जोनास ब्रदर्स आणि तिचे अनेक बालपणीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
Web Summary : Nick Jonas's stepsister, Maya Kibbel, passed away at 30 after battling a rare disease. The Jonas family mourns the loss of their childhood friend. She suffered from Wilson's disease and had been struggling for years. Nick expressed his grief on social media.
Web Summary : निक जोनास की सौतेली बहन माया किबेल का 30 साल की उम्र में एक दुर्लभ बीमारी से जूझने के बाद निधन हो गया। जोनास परिवार अपने बचपन के दोस्त के नुकसान पर शोक व्यक्त करता है। वह विल्सन रोग से पीड़ित थीं और वर्षों से संघर्ष कर रही थीं। निक ने सोशल मीडिया पर अपना दुख व्यक्त किया।