Join us
Daily Top 2Weekly Top 5

निक जोनासने पत्नी प्रियांका चोप्राचा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा; बघा त्याचा अंदाज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 18:54 IST

निक जोनास याने प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा काल वाढदिवस सेलिब्रेट झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त चाहते, नातेवाईक सर्वांनीच सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. असं असलं तरी तिचा पती निक जोनास याने मात्र एकदम हटके अंदाजात पत्नी प्रियांका चोप्राला शुभेच्छा दिल्यात. त्याने तिच्यासोबतचा एक अत्यंत रोमँटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून या फोटोतील त्या दोघांचा अंदाज बघून तुम्हीही म्हणाल ‘वाह’...

निक जोनास याने प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्यासोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला असून ती पती निक जोनासच्या मांडीवर बसलेली आहे. दोघेही जण एकमेकांकडे बघण्यात एवढे दंग झाले आहेत की, त्यांना जगाचे भानच उरलेले नाही. ‘हॅपी बर्थडे ब्युटीफुल’ म्हणत तिला रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

निक जोनास आणि प्रियांका चोप्रा हे कपल एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खुप आवडत आहे. चाहत्यांच्या अनेक कमेंट्स आणि शुभेच्छा या माध्यमातून प्रियांकापर्यंत पोहोचत आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूड