Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्रा व निक जोनासच्या आयुष्यात ‘एक्स्ट्रा चोप्रा जोनास’ची एन्ट्री! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:20 IST

बिलबोर्ड हॉट 100 सॉन्गच्या चार्टमध्ये जोनास ब्रदर्सचा ‘सकर’ हा अल्बम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मग काय, ‘सेलिब्रेशन तो बनताही है...’

ठळक मुद्दे ‘सकर’ हा जोनास बंधूंचा कमबॅक व्हिडिओ अल्बम आहे. जोनास ब्रदर्सनी या म्युझिक व्हिडिओद्वारे तब्बल सहा वर्षांनंतर वापसी केली आहे.

प्रियंका चोप्रा सध्या जाम खूश आहे. प्रोफेनल आणि पर्सनल दोन्ही आयुष्यात संतुलन राखत पीसी पुढे जातेय. प्रियंकाचा पती निक जोनास हाही जोरात आहे. जोनास ब्रदर्सचा अल्बम ‘सकर’ जगभर धूम करतोय. बिलबोर्ड हॉट 100 सॉन्गच्या चार्टमध्ये जोनास ब्रदर्सचा हा अल्बम पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. मग काय, ‘सेलिब्रेशन तो बनताही है...’प्रियंका व निक दोघांनीही अलीकडे या यशाचा आनंद साजरा केला. केवळ इतकेच नाही तर निकने आपल्या पत्नीला ‘एक्स्ट्रा जोनास’ नावाची एक शानदार भेटही दिली. होय, प्रियंकाने निकने दिलेल्या या गिफ्टचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोत प्रियंका व निक अलिशान मर्सिडीज- मेबॅक कारसोबत दिसत आहेत. हीच ती कार जी निकने प्रियंकाला गिफ्ट केली. ‘पती नंबर एक वर पोहोचला की, पत्नीला मेबॅक गिफ्ट मिळते. भेटा एक्स्ट्रा चोप्रा जोनासला...आय लव्ह यू बेबी...बेस्ट हसबण्ड एवर...’, असे प्रियंकाने हा फोटो शेअर करत लिहिले आहे. आता इतका प्रेमळ नवरा आणि सोबत इतके अलिशान गिफ्ट म्हणल्यावर कुठली बायको सुखावणार नाही. प्रियंकाही अशीच सुखावलीय...

 ‘सकर’ हा जोनास बंधूंचा कमबॅक व्हिडिओ अल्बम आहे. जोनास ब्रदर्सनी या म्युझिक व्हिडिओद्वारे तब्बल सहा वर्षांनंतर वापसी केली आहे. जोनास ब्रदर्सच्या बेटरहाफही या व्हिडिओत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रियंकाने हा म्युझिक व्हिडिओ शेअर केला होता.  यात प्रियंका पती निक जोनास आणि आपल्या दीरांसोबत नाचताना-गाताना दिसतेय. निक जोनास व त्याच्या भावांनी सहा वर्षांपूर्वी आपली पार्टनरशिप संपवत वेगवेगळ्या वाटा निवडल्या होत्या. पण निकच्या लग्नानंतर जोनास ब्रदर्स पुन्हा एकत्र आले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास