Join us
Daily Top 2Weekly Top 5

निक जोनासने दोन्ही भाऊ अन् प्रियंकासह माधुरी दीक्षितच्या 'या' गाण्यावर धरला ठेका, रील व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:06 IST

भारताचा जावई निक जोनासला बॉलिवूड गाण्याची भुरळ

भारतीय संगीताची जादू जगभरात पसरली असून आता हॉलिवूडचे दिग्गज कलाकारही बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत. अमेरिकन पॉप स्टार आणि प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याचे बॉलीवूड प्रेम पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आले आहे. निकने सोशल मीडियावर हिंदी गाण्यांवरील अनेक व्हिडीओ आधी शेअर केले आहेत ज्याला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलंय. आता त्याने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने भारतीय चाहत्यांची मने जिंकली असून तो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय 

निक जोनासने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नीसोबत आणि भावांसोबत चक्क 'पुकार' चित्रपटातील 'के सरा सरा' या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मूळ गाण्यात माधुरी दीक्षित आणि प्रभु देवा यांनी आपल्या नृत्याने कमाल केली होती, त्याच गाण्यावर निक आणि त्याच्या भावांनी ठेका धरला आहे. या व्हिडिओच्या शेवटी निकचा एक भाऊ परत फिरताना दिसतोय, तर दुसरा चक्क केळं खाण्यात मग्न आहे, ज्यामुळे या व्हिडिओची मजा अधिकच वाढली आहे.

निकच्या या देसी अंदाजावर भारतीय चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "निक जीजू, आता लवकरच बॉलिवूडमध्ये गाणी गाण्यास सुरुवात करा," अशी मागणी एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्या एकाने "तुमची ही एनर्जी पाहून आम्हाला आश्चर्य वाटते, म्हणूनच तुम्ही आमचे 'नॅशनल जीजू' आहात," अशा भावना व्यक्त केल्या आहेत. निकचे भारतीय संस्कृती आणि संगीताप्रती असलेले प्रेम पाहून प्रत्येक भारतीय त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

निक जोनासने बॉलिवूड गाण्यावर डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्याने 'कुर्बानी' चित्रपटातील 'आप जैसा कोई' या गाण्यावर प्रियांका आणि आपल्या भावांसह (केविन आणि जो जोनास) जबरदस्त डान्स केला होता. त्या व्हिडिओतील निकची मस्ती आणि डान्स स्टेप्स चाहत्यांच्या आजही लक्षात आहेत. निक वारंवार अशा पोस्ट करून आपण मनातून पूर्णपणे 'देसी' आहोत, हे सिद्ध करत असतो.

गेल्या काही दिवसांत निकचे बॉलिवूड कनेक्शन अधिकच घट्ट होताना दिसत आहे. त्याने अलीकडेच आदित्य धरच्या 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' गाण्यावर आपल्या टीमसोबत ताल धरला होता. इतकेच नव्हे तर ऋतिक रोशनच्या 'आवन जावन' आणि प्रियांकाच्या 'साजन साजन' गाण्यावरही त्याने आपले डान्स मूव्ह्स दाखवले आहेत. एकंदरीत निक जोनासवर आता बॉलिवूडचा रंग पूर्णपणे चढला असून तो खऱ्या अर्थाने भारताचा जावई झाल्याचे प्रेक्षकांना वाटते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nick Jonas, brothers, Priyanka dance to Madhuri Dixit song; reel goes viral

Web Summary : Nick Jonas's Bollywood love continues as he dances with Priyanka and his brothers to Madhuri Dixit's song 'Ke Sara Sara'. His desi moves and previous Bollywood dance videos are viral, endearing him to Indian fans.
टॅग्स :निक जोनासप्रियंका चोप्राबॉलिवूड