Join us
Daily Top 2Weekly Top 5

नववधू सना खान पतीसह निघाली फिरायला, लक्ष वेधून घेणारा तिचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 15:41 IST

अलीकडेच सना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती, ज्यात बिर्यानीचा आनंद लुटत असल्याचा पाहायला मिळत आहे.

नववधू सना खान पती  मुफ्ती अनस सईदसोबतचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये नवविवाहित दाम्पत्य कार राइडचा आनंद घेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ स्वत: सनाने शूट केला आहे. अनस राईडिंग करताना कॅप आणि मास्क घालताना  दिसत आहे, तर सनाने हलका गुलाबी रंगाचा सूट परिधान केलेला दिसत आहे.

अलीकडेच सना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती, ज्यात बिर्यानीचा आनंद लुटत असल्याचा पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करून तिने लिहीले होते की,  ही बिर्याणी तिच्यासाठी तिच्या सासू बनवली आहे. 'सासू माँ माझ्यासाठी बिर्याणी बनवित आहे' असं अभिनेत्रीने लिहिले होते.

सना खानने 20 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील सूरत येथे राहणारे मुफ्ती सईदशी लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.  या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान  व्हायरल झाले होते. या दोघांच्या लग्नाला आठवडा पूर्ण झाल्यानंतर सनाने तिच्या निकाहची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती.

तिच्या निकाहचे फोटो शेअर करताना तिने पतीसाठी सुंदर मेसेजही लिहीला होता.  'तुमच्याशी लग्न करण्यापूर्वी मी कधीही विचार केला नव्हता की  प्रेम इतके सुंदर असू शकते. निकाह झाल्यानंतर सध्या हे कपल एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत.

‘अल्लाह’ मला माझ्या प्रवासात मदत करेन...! अभिनेत्री सना खानचा बॉलिवूड संन्यास

सना खानने रोमन, इंग्रजी व अरबी अशा तीन भाषांमध्ये पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, ‘आज मी आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळवणार पोहोचली आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या काळात मला पैसा, प्रतिष्ठा, प्रेम सगळे काही मिळाले. चाहत्यांकडून मिळालेल्या या सर्वगोष्टींसाठी मी त्यांची आभारी आहे. पण काही दिवसांपासून एक वेगळाच प्रश्न पडला होता.

पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच जगात येण्याचे उद्दिष्ट आहे का? जे निराधार, अनाथ आहेत अशांसाठी आपले काहीच कर्तव्य नाही का? मृत्यू कधीही गाठू शकतो आणि मेल्यानंतर आपले काय; हा विचार आपण करायला नको? या प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. विशेषत: मरणानंतर माझे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर मी शोधते आहे.

त्यामुळे आज मी घोषणा करते की, आजपासून मी बॉलिवूड इंडस्ट्रीतील आयुष्य सोडून मानवता आणि अल्लाहच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेते आहे. माझ्या सर्व बहिण-भावांना विनंती करते की, यापुढे इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीसाठी मला निमंत्रण देऊ नये. खूप खूप आभार.

टॅग्स :सना खान