Join us

New Poster Release : ‘बाहुबली-२’ च्या पोस्टरने वाढविली उत्सुकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 21:28 IST

दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी त्यांच्या आगामी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या बहुचर्चित सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. ...

दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी त्यांच्या आगामी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या बहुचर्चित सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरचे दोन भाग असून, वरच्या भागात कटप्पा अमेरेंद्र बाहुबलीला हातात घेऊन खेळवताना दिसत आहे, तर खालच्या भागात कटप्पा बाहुबलीला तलवारने मारताना दिसत आहे. खरं तर याच दृश्यामुळे ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ हा यक्षप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून उपस्थित झालेला आहे. आता याचाच उलगडा या भागात होईल, अशी अपेक्षा प्रेक्षक करीत आहेत. दरम्यान, राजामौली यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले की, ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याच मुलाला या व्यक्तीने मारून टाकलं. तसेच त्यांनी असेही लिहिले की, डिझायनर जेगन यांच्या डोक्यात ही कल्पना आल्यानेच ते लोकांशी शेअर करण्यास मी स्वत:ला आवरू शकलो नाही. हे बघा ‘बाहुबली-२’चे नवे पोस्टर. जुलै २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘बाहुबली’ हा सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. कमाईचे अनेक रेकॉर्ड या सिनेमाने ब्रेक केले होते. तसेच दक्षिण भारतातील आतापर्यंतचा सर्वात सुपरहिट सिनेमा म्हणूनही एक नवा कीर्तिमान बाहुबलीने स्वत:च्या नावावर केला. पहिल्या भागात ‘शिवा’ नावाच्या व्यक्तीची कथा दाखविण्यात आली होती. ज्याला अखेरीस समजते की, तो अमरेंद्र बाहुबलीचा मुलगा आहे. तसेच त्याला असेही समजते की, अमरेंद्र बाहुबली माहिष्मती जनतेचा प्रिय राजा होता. }}}} या सिनेमात राणा दग्गुबाती याने भल्लाल देवची भूमिका साकारली होती. भल्लाल देव एक महान योद्धा होता. मात्र त्याला भाऊ बाहुबलीची प्रसिद्धी सलत होती. त्यामुळेच तो पुढे तानाशाही राजा म्हणून पुढे येतो. दुसºया भागात प्रेक्षकांना भल्लाल देव आणि बाहुबली यांच्यातील तुफान युद्ध बघावयास मिळणार असून, कटप्पा बाहुबलीला का मारतो, या प्रश्नाचे कोडं सुटणार आहे. त्याचबरोबर महेंद्र बाहुबली याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेतानाही दाखविण्यात येणार आहे. सिनेमात अभिनेत्री अनुष्का शेट्टीने अमरेंद्र बाहुबली याची पत्नी देवसेनाची भूमिका साकारली होती. दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर १६ मार्च रोजी रिलीज केला जाणार असून, त्यातून सिनेमातील कथेचा प्रेक्षकांना अंदाज बांधणे शक्य होणार आहे. मात्र सिनेमाशी संबंधित बºयाचशा गोष्टींचा उलगडा या २८ एप्रिल रोजीच होणार आहे. आता प्रेक्षकांना या तारखेची प्रतीक्षा असून, पडद्यावर बाहुबलीचा रोमांच अनुभवण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.