Join us

'हसीना : दी क्वीन ऑफ मुंबई’चे नवे पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 16:41 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट हसीना : द क्वीन ऑफ मुंबईचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या फोटोमध्ये ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट हसीना : द क्वीन ऑफ मुंबईचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या फोटोमध्ये श्रद्धा बुरख्यात दिसतेय. या पोस्टरमध्ये श्रद्धा अॅग्रेसिव्ह लूकमध्ये दिसते आहे. या पोस्टरवर अट्ठासी केस दर्ज पर कोर्ट में हाजरी सिर्फ एक बार अशी ओळ लिहिण्यात आली आहे तसेच चित्रपटाची रिलीज टेड सुद्धा लिहिण्यात आली आहे. 18 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. अपूर्वा लखिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे तर नाहिद खान या चित्रपटाचे निर्मिती करतोय. आधी हा चित्रपट रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर जग्गा जासूस बरोबर 14 जुलैला रिलीज होणार होता. त्यानंतर 28 जुलैला अर्जुन कपूरचा चित्रपट मुबारकांबरोबर रिलीज होणार होता मात्र बॉक्स ऑफिसवरील क्लैशस टाळण्यासाठी या चित्रपटाला 18 ऑगस्टमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटात श्रद्धासोबत तिचा भाऊ सिद्धांत कपूरसुद्धा दिसणार आहे. सिद्धांत या चित्रपटात दाऊद इब्राहिमची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्रद्धाने इन्स्टाग्रामवर सिद्धांतचा दाऊद इब्राहिमच्या लूकमधला फोटो शेअर केला होता. या भूमिकेसाठी सिद्धांतने 9 किलो वजन वाढवले आहे.  श्रद्धा कपूर साकारत असलेल्या हसीना पारकर हिचे 6 जुलै 2014 ला निधन झाले आहे. हसीनावर 88 केस दाखल होत्या मात्रतरी सुद्धा फक्त ती एकदाच कोर्टात गेली होती. बॉलिवूडमध्ये असे पहिल्यांदाच होतेय की खऱ्या आयुष्यातील भाऊ-बहिण  पडद्यावर भाऊ- बहिणीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. श्रद्धाने दुसरीकेड सायना नेहवालच्या बायोपिकसाठीच्या तयारीला सुरुवात केली आहे. एक वृत्त संस्थेच्या माहितीनुसार श्रद्धा प्रकाश पादुकोण यांच्या अॅकेडमीमधून एक सीनिअर कोचकडून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतेय.