New Look Viral : ‘लेडी दबंग’ बनून मुंबईच्या रस्त्यावर उतरली दीपिका पादुकोण! तुम्हीही पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 11:39 IST
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी ती तिचा आगामी चित्रपट ‘पद्मावत’मुळे चर्चेत राहते तर बॉयफ्रेन्ड रणवीर ...
New Look Viral : ‘लेडी दबंग’ बनून मुंबईच्या रस्त्यावर उतरली दीपिका पादुकोण! तुम्हीही पाहाच!!
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या भलतीच चर्चेत आहे. कधी ती तिचा आगामी चित्रपट ‘पद्मावत’मुळे चर्चेत राहते तर बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगमुळे. आताही ती चर्चेत आहे पण एका खास कारणाने. होय, दीपिकाचा एक नवा अवतार समोर आला आहे. तिच्या या नव्या अवताराचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, हा नवा अवतार तिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा अगदीच वेगळा आहे. यात दीपिका पोलिस इन्स्पेक्टरच्या वेषात दिसतेय. अलीकडे दीपिका मुंबईच्या रस्त्यांवर पोलिस आॅफिसरच्या लूकमध्ये फिरताना दिसली. तिचा तो ‘लेडी दबंग’ अवतार पाहून सगळेच चाट पडलेत. साहजिकच दीपिकाचा हा ‘लेडी दबंग’ लूक कुठल्या चित्रपटात दिसणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तिचा हा लूक कुठल्या चित्रपटासाठी नाही तर एका जाहिरातीसाठी आहे. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोळ्यांवर गॉगल आणि हाताला गुंडाळलेला लाल रंगाच रूमाल अशा कडक अवतारात दीपिका चांगलीच ‘दबंग’ दिसतेय. तुम्हीही हे फोटो पाहा आणि ते कसे वाटते ते आम्हाला जरूर कळवा.ALSO READ : संजय लीला भन्साळींना अंक शास्त्राचा ‘आधार’! ‘पद्मावती’तील I गेला आणि आला अधिकचा A !मध्यंतरी दीपिका लग्न करणार अशी चर्चा होती. गत ५ जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्याच दिवशी दीपिका व रणवीर सिंग एन्गेज्ड होणार, अशी बातमी आली होती. पण सरतेशेवटी ही बातमी अफवाच ठरली. लवकरच दीपिका व रणवीर या दोघांचा ‘पद्मावत’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. रिलीजआधी हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. या वादामुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडली होती. अखेर सेन्सॉर बोर्डाने पाच दुरूस्त्या व नाव बदलण्याच्या अटीवर या चित्रपटाला हिरवी झेंडी दिली होती. त्यानुसार, येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. तूर्तास दीपिकाने अद्याप कुठलाही सिनेमा साईन केलेला नाही. याऊलट रणवीर ‘गली बॉय’,‘सिम्बा’ या चित्रपटात बिझी आहे.