New Look : पहा ‘बेगम जान’ विद्या बालनच्या अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 20:05 IST
बॉलिवूड सिनेमात प्रत्येक भूमिका दमदारपणे साकारणारी अभिनेत्री विद्या बालन तिच्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या विद्या ...
New Look : पहा ‘बेगम जान’ विद्या बालनच्या अदा
बॉलिवूड सिनेमात प्रत्येक भूमिका दमदारपणे साकारणारी अभिनेत्री विद्या बालन तिच्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या विद्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती वेगवेगळ्या लुकमध्ये बघावयास मिळत आहेत. विद्याच्या या अदा ‘बेगम जान’ला शोभणाºया असल्याने प्रेक्षक तिच्यावर लट्टू होत नसतील तरच नवल. खरं तर विद्या ‘बेगम जान’विषयी खूपच उत्सुक आहे. तिच्या मते, या सिनेमात काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असा आहे. त्यामुळे सध्या मी या सिनेमाच्या रिलिजची प्रतीक्षा करीत असून, प्रेक्षक सिनेमाचा भरपूर आनंद घेतील असा मला विश्वास आहे. शिवाय या सिनेमावरून विद्याला लोकांच्या येत असलेल्या प्रतिक्रियांमुळे ती अधिकच हरकून गेली आहे. दरम्यान, विद्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरत असून, लोकांमध्ये जाताना प्रत्येकवेळी तिचा नवा लूक बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे विद्या तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत असल्याने, तिची फॅन्स या सिनेमाविषयी खूपच उत्सुक दिसत आहेत. खरं तर विद्याला फॅशन आयकॉन म्हणून ओळखले जाते. तिची फॅशन स्टाइल भारावून टाकणारी असून, साडीमध्ये विद्याचे रूप अधिकच खुलून दिसते. साडी अन् त्यावर ज्वेलरी हा विद्याचा आवडता पोशाख असून, तिचे फॅन्सदेखील तिला याच अंदाजात पसंत करतात, हेही तेवढेच खरे आहे. ‘श्रीजीत मुखर्जी’ दिग्दर्शित ‘बेगम जान’ हा सिनेमा बंगाली सिनेमा ‘राज कहिनी’ याचा रिमेक आहे. सिनेमात विद्या भारताच्या फाळणीदरम्यान एका कोठीची मालकीण दाखविण्यात आली आहे. तिच्यासोबत अभिनेता नसिरुद्दीन शाह आणि गोहर खान मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या १४ एप्रिल रोजी रिलिज होणार आहे.