Join us

राणा दग्गुबातीचा हा नवा लुक पाहाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 13:52 IST

'बाहुबली 2' चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील त्याचा लूक राणाने ...

'बाहुबली 2' चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा राणा दग्गुबाती लवकरच हाथी मेरे साथी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील त्याचा लूक राणाने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आपला नवा लूक शेअर करत त्यांने आपल्या फॅन्सना नवं वर्षाचे गिफ्ट दिले आहे.  या फोटोमध्ये राणा एक भल्ल्या मोठ्या हत्तीच्या सोंडेच्या मधोमध उभा आहे. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसतायेत. या लूकमध्ये राणाचे केस खूप लहान दिसतायेत तर दाडीपण ट्रिम केली आहे. चित्रपटात राणाच्या भूमिकेचे नाव वनदेव असणार आहे. हा फोटो शेअर करताना त्यांने एक कप्शन सुद्धा लिहिले आहे. एका नव्या चित्रपटाची कथा सांगण्यासाठी नव्या वर्षात प्रवेश करतो आहे. भेटा हाथी मेरे साथीमधल्या वनदेवला. तुम्हाला हे फोटो बघून बाहुबली 2 मधल्या काही दृष्यांची सुद्धा आठवण येऊ शकते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सोलोमन करत आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग थायलँडला झाली आहे. 2018 च्या दिवाळीच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणा दग्गुबातीचा चित्रपट बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड आधीच तोडले आहेत. जवळपास 2000 कोटींची कमाई बाहुबली 2 ने केली होती. 2017 मधला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान बाहुबली 2 ला आधीच मिळाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. बाहुबली 2 ने एक नवा इतिहास लिहिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी दम मारो दम, डिपार्टमेंट आणि बेबीसारख्या चित्रपटांमध्ये ही त्यांने भूमिका केली आहे. राणा दग्गुबाती हॉलिवूडमधील सायन्स फिक्शन सिरीज ‘स्टार वार्स’चे निर्माता जॉज लुकास आपले प्रेरणास्थान मानतो. त्याचे घर पाहण्याची राणाची फार इच्छा आहे.