Join us
Daily Top 2Weekly Top 5

आली लहर केला कहर... नव्या लूकमुळे रितेश झाला ट्रोल, कुणी म्हणाले पोपट तर कुणी गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 11:06 IST

रितेश देशमुखने नवीन स्टाईल करून पत्नी जेनेलियाला सरप्राईज केले. पण, या लूकमुळे ट्रोल केले जात आहे.

आपल्या विनोदी अंदाजाने रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारा अभिनेता रितेश देशमुख नेहमी आपल्या लूकमुळे चर्चेत असतो. कधी चित्रपटासाठी तर कधी असेच. बऱ्याचदा वेगवेगळे लूक केलेले पहायला मिळतात. नुकताच तो त्यांच्या नवीन लूकमुळे चर्चेत आला आहे. रितेशने त्याची पत्नी जेनेलिया डिसूझाला सरप्राईज करण्यासाठी हा लूक केला. पण, सोशल मीडियावर त्याला त्याचे हे सरप्राईज भारी पडले. कारण या लूकमुळेच सध्या तो ट्रोल होतो आहे.

रितेश देशमुखने केसांना रेड स्क्वाइरल टेल केला असून या लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. जेनेलियाने इंस्टाग्रामवर रितेशचा कोलाज फोटो शेअर करत लिहिले की, मी रितेशला सांगितले की मला नवीन लूकने सरप्राईज कर. तो रेड स्क्वाइरल टेल करून समोर आला. हा लूक कूल आहे का?

जेनेलियाने विचारलेले प्रश्नाचे उत्तर लोक मस्करीत देत आहेत. काही लोक रितेशच्या लूकमुळे नाराज झाले आहेत. एका व्यक्तीने लिहिले की, माणूस आहे की पोपट. एका युजरने सांगितले की सर्व काही ठिक आहे फक्त त्या टेलशिवाय. एका व्यक्तीने लिहिले की कोंबड्याची चोच कशी आहे? इतकेच नाही तर एकाने रितेशला गे असे संबोधले.

रितेश देशमुखच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर रितेश देशमुख हाऊसफुल ४मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो मरजावां चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत नसून एक व्हिलन चित्रपटातही यापूर्वी काम केले आहे.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा