Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कृतीला मिळाला ‘न्यू जिम स्टुडंट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 21:32 IST

अभिनेत्री कृती सेनन हिला एक नवा शिष्य मिळालायं. आता तुम्ही म्हणाल, हे काय, भलतेच. पण खरं आहे. कृती सध्या ...

अभिनेत्री कृती सेनन हिला एक नवा शिष्य मिळालायं. आता तुम्ही म्हणाल, हे काय, भलतेच. पण खरं आहे. कृती सध्या दक्षिण आफ्रिकेत ‘राबता’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. यात सुशांत सिंह राजपूत तिचा नायक आहे. या दोघांमध्ये प्रेम फुलतयं, अशी चर्चा आहे. पण ती झाली नुसती चर्चा. खरी बातमी पुढे आहे, ती म्हणजे कृतीला शिष्य मिळाला आहे. किर्तीने आज एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात ती जिममध्ये वर्कआऊट करतेयं आणि तिच्या पायाशी कुणीतरी बसलयं, असे दिसतयं. फोटोतील व्यक्तिने अक्षरश: कृतीचे पाय धरले आहेत आणि कृती या आपल्या शिष्याला हसतमुखाने आशीर्वाद देतेयं. आता तुम्ही म्हणाल, कोण हा शिष्य..अहो, दुसरा तिसरा कुणी नाही तर आपला सुशांत..सुशांत सिंह राजपूत. ‘माय न्यू जिम स्टुडंट’ असे कॅप्शनकृतीने या फोटोला दिले आहे. या फोटोतही कृती व सुशांतची केमिस्ट्री गजब दिसतेयं. सुशांत व त्याची गर्लफे्रन्ड अंकिता लोखंडे यांचे फाटल्याच्या बातम्या सध्या मीडियात आहे. तेव्हा तुम्ही तो काय अर्थ काढा!!