Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिप्पीचा नवीन प्रशंसक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 10:08 IST

 ‘ शी इज स्मार्ट, कार्इंड, फनी अ‍ॅण्ड ब्युटीफुल...’ हे शब्द कुणा दुसºयाबद्दल नसून सध्याची बॉलीवूडमधील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री ...

 ‘ शी इज स्मार्ट, कार्इंड, फनी अ‍ॅण्ड ब्युटीफुल...’ हे शब्द कुणा दुसºयाबद्दल नसून सध्याची बॉलीवूडमधील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री दीपिका पदुकोनविषयी काढण्यात आले आहेत. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कोणी म्हटले आहेत? हो ना...तर प्रसिद्ध हॉलीवूड हेअरस्टायलिस्ट अदिर अबरजेल हे बॉलीवूडच्या मस्तानीच्या व्यक्तीमत्त्वामुळे फारच प्रेरित झाले आहेत. त्यांनी फेसबुकवर त्याच्यासोबत तिचा फोटो अपलोड केला असून त्यावर कॅप्शन दिले आहे की,‘ धीस वुमन इज स्मार्ट, कार्इंड,फनी अ‍ॅण्ड ब्युटीफुल. लव्ह डूर्इंग युअर हेअर धीस पास्ट वीक दीपिका पदुकोन. यु ट्रुली आर ब्युटीफुल फ्रॉम  द इनसाईड आऊट.’वेल, दीपिकाचे प्रशंसक दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तिने बॉलीवूडप्रमाणेच हॉलीवूडमध्येही स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.