Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना कपूरच्या या फोटोला करण्यात आले ट्रोल, नेटिझन्सने चक्क विचारला नको तो प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 19:15 IST

करिनाने एका मासिकासाठी नुकतेच फोटोशूट केले असून या फोटोंमुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकरिनाच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स येत आहेत. एकाने करिनाचा गुडघा कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे तर दुसऱ्याने फोटोशॉप करण्याची देखील हद्द असते असे मासिकाला सुनावले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्क्रिनवर खूपच छान दिसतात. त्यांचा हा ग्लॅमरस अंदाज पाहून त्यांचे फॅन्स त्यांच्या प्रेमात पडतात. करिना कपूर तर तिच्या सौंदर्यासाठी आणि स्टाईलसाठी चांगलीच ओळखली जाते. पाश्चिमात्य असो वा भारतीय असो कोणताही पेहराव करिनावर उठून दिसतो. पण आता करिनाने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमधील फोटोंसाठी तिला ट्रोल करण्यात येत आहे.

करिनाने ग्रेझिया इंडिया या मासिकासाठी नुकतेच एक फोटोशूट केले असून या फोटोशूटमधील फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोत करिना खूपच छान दिसत असली तरी या फोटोतील एक मोठी चूक नेटिझन्सच्या लक्षात आली आहे आणि त्याचमुळे नेटिझन्सने या फोटोसाठी करिनाला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. हा फोटो पाहिल्यास करिनाच्या पायांना फोटोशॉप करून अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे आपल्या लक्षात येते. पण या फोटोत तिच्या पायासोबत तिचा गुडघाच दिसत नाहीये. करिनाचा गुडघा कुठेय असा प्रश्न नेटिझन्स आता विचारत आहेत.

करिनाच्या या फोटोवर भन्नाट कमेंट्स येत आहेत. एकाने करिनाचा गुडघा कुठे गेला असा प्रश्न विचारला आहे तर दुसऱ्याने फोटोशॉप करण्याची देखील हद्द असते असे चक्क मासिकाला सुनावले आहे. करिनाचे पाय कधीच इतके पातळ नव्हते असे देखील कमेंटमध्ये लिहिण्यात आले आहे. 

करिनाचा गुड न्यूज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात करिनाचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून तिच्या चाहत्यांना हा अंदाज प्रचंड आवडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून या चित्रपटात करिनासोबतच अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दलजीत दोसांज यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :करिना कपूरगुड न्यूज