Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही कधी बार उडवताय?", परिणीती आणि राघव यांच्या लग्नानंतर आदित्य ठाकरेंना नेटकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 16:06 IST

परिणीती आणि राघव यांच्या लग्नानंतर चाहते आदित्य ठाकरेंच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आदित्य ठाकरेंनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमधील पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. राघव आणि परिणीतीच्या लग्नाला अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. 

आदित्य ठाकरेंनी परिणीती आणि राघव या नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. परिणीती आणि राघव यांच्या लग्नातील फोटो आदित्य ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी "तुम्हा दोघांचं अभिनंदन! तुमच्या आनंद आणि आरोग्यासाठी प्रार्थना...खूप सारं प्रेम" असं कॅप्शन दिलं आहे. 

परिणीती आणि राघव यांच्या लग्नानंतर चाहते आदित्य ठाकरेंच्या लग्नाची वाट पाहत आहेत. आदित्य ठाकरेंनी शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत "साहेब तुमचा नंबर कधी? आमच्या कोल्हापुरात लगीन ठेवा आणि गोंधळाला तांबडा पांढरा करुया आपण" असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "साहेब तुम्ही कधी बार उडवताय?" अशी कमेंट केली आहे. "आपण कधी करताय, शुभमंगल सावधान" असंही एकाने म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने "पण आम्ही तुमच्या लग्नाची वाट पाहत आहोत. तुम्ही कधी लग्न करताय?" अशी कमेंट केली आहे. 

आदित्य ठाकरेंची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आदित्य ठाकरे कधी लग्न करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

 

टॅग्स :आदित्य ठाकरेपरिणीती चोप्रासेलिब्रिटी