Join us
Daily Top 2Weekly Top 5

कियारा अडवाणीच्या अंगात ‘कबीर सिंग’चे भूत...; जाणून घ्या काय आहे  भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:49 IST

Guilty Netflix's New Series : कियारा अडवाणीच्याच्या तोंडचे संवाद ऐकून लोकांना ‘कबीर सिंग’ची आठवण होतेय.

ठळक मुद्दे6 मार्चला ‘गिल्टी’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.

अभिनेत्री कियारा अडवाणी हिचे टॅलेंट कुणापासूनही लपून राहिलेले नाही. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तिच्या हटके भूमिका पाहताक्षणी डोळ्यांत भरतात. लवकरच ती एका कॉलेज गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. होय, नेटफ्लिक्स ओरिजनल फिल्म ‘गिल्टी’मध्ये कियारा एका हटके भूमिकेत दिसणार आहे. नुकताच ‘गिल्टी’चा ट्रेलर रिलीज झाला आणि यातील कियाराची भूमिका पाहून सगळेच अवाक् झालेत. या ट्रेलरमध्ये कियाराने नाकात नोजरिंग घातली आहे. केस ग्रे कलरमध्ये रंगवलेले आहेत. डोक्यावर हॅट आहे आणि तिच्या तोंडचे संवाद ऐकून लोकांना ‘कबीर सिंग’ची आठवण होतेय.

होय, ‘गिल्टी’चा ट्रेलर रिलीज होताच, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. ‘प्रीतीच्या अंगात कबीर सिंगचे भूत शिरलेय,’ असे काहींनी लिहिले आहे. तर काहींनी ‘कबीर सिंगने प्रीतीला बिघडवले,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. या कमेंट इतक्या मजेशीर आहेत की, तुम्हालाही हसू आवरणार नाही. कबीर सिंग या चित्रपटात कियाराने प्रीतीची भूमिका साकारली होती.

‘गिल्टी’मध्ये कियारा नानकीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सेंट मार्टिन कॉलेजची स्टुडंट असलेल्या नानकीचे तीन मित्र आहेत. हे सगळे एकत्र गातात, स्मोक करतात, कॉलेज लाईफ एन्जॉय करतात. पण मग, नानकीचा ग्रूप एका कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकतो. ट्रेलर याच सस्पेन्सवर आधारित आहे.

ट्रेलरमध्ये कियारा एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. अंगभर टॅटू आहेत. 6 मार्चला ‘गिल्टी’ नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. रूची नरेनने याचे दिग्दर्शन केले आहे. कियाराने ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण नेटफ्लिक्सवरच्या ‘लस्ट स्टोरिज’ने तिला कधी नव्हे इतकी लोकप्रियता मिळवून दिली होती. यानंतर ती कबीर सिंगमध्ये शाहिद कपूरसोबत झळकली. अलीकडे अक्षय कुमार, करिना कपूरसोबत ती ‘गुड न्यूज’मध्ये दिसली होती.

टॅग्स :कियारा अडवाणीकबीर सिंगनेटफ्लिक्स