Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! आमिर खानची अट ऐकून निर्मात्यांचे डोळे पांढरे; ओशोंची सीरिज थंडबस्त्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 21:00 IST

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा आमिर खानचा चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर आमिर नेटफ्लिक्ससोबत मिळून ओशोंच्या आयुष्यावरची सीरिज घेऊन येणार, अशी बातमी आली.

‘ठग्स ऑफ  हिंदोस्तान’ हा आमिर खानचा चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर आमिर नेटफ्लिक्ससोबत मिळून ओशोंच्या आयुष्यावरची सीरिज घेऊन येणार, अशी बातमी आली. या सीरिजमध्ये आमिर स्वत: ओशोंची भूमिका साकारणार, असेही म्हटले गेले. पाठोपाठ दिग्दर्शक शकुन बत्रा ही सीरिज दिग्दर्शित करणार, अशीही बातमी आली. पण ताजी बातमी मानाल तर नेटफ्लिक्सची ही सीरिज तूर्तास तरी लांबणीवर टाकली गेलीय. याचे कारण काय तर आमिर खान.

होय, आमिरने म्हणे या सीरिजसाठी नेटफ्लिक्सकडे भरभक्कम रक्कम मागितली. आमिरच्या डिमांडचा हा आकडा पाहून निर्मात्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आणि परिणामी निर्मात्यांनी हा प्रोजेक्ट होल्डवर टाकणे योग्य समजले. सूत्रांचे मानाल तर, निर्मात्यांनी आमिरची बरीच मनधरणी केली. पण आमिर एक रूपयाही कमी करायला तयार नव्हता. त्यामुळे निर्मात्यांनी अखेर ही सीरिज बनवण्याचा इरादा काही काळासाठी रद्द केला. त्यामुळे आता हा प्रोजेक्ट पूर्णपणे बंद होतो की, आमिरच्या अटींवर सुरु होतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आमिरकडे चार स्क्रिप्ट आहेत. अलीकडे एका मुलाखतीत स्वत: आमिरने याबाबत सांगितले होते. मी सध्या चार स्क्रिप्टमध्ये बिझी आहे. चारही कथा अतिशय शानदार आहेत. यापैकी दोन कथांसाठी मला माझे वजन कमी करावे लागणार आहे. त्यामुळे मी खास डाएट सुरु केले आहे. या महिन्याच्या अखेरिस मी माज्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. पण या चारही कथांवर माझे समांतर काम सुरू आहे, असे आमिर या मुलाखतीत म्हणाला होता.

 

टॅग्स :आमिर खान