Join us

​नर्गिसने उठवला ‘त्या’ रहस्यावरून पडदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 19:36 IST

नर्गिस फाखरी सध्या बरीच चर्चेत आहे. नर्गिस बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार, अशी चर्चा होती. पण नर्गिस दोन तीन दिवसांआधीच ...

नर्गिस फाखरी सध्या बरीच चर्चेत आहे. नर्गिस बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकणार, अशी चर्चा होती. पण नर्गिस दोन तीन दिवसांआधीच  ‘बॅन्जो’च्या प्रमोशनसाठी मुंबईत परतली.  नर्गिस मुंबई विमानतळावर उतरली आणि सर्व फोटोग्राफर्सचे कॅमेरे तिच्याकडे वळले. पण हे काय?? नर्गिस कॅमेºयांपासून चेहरा लपवतांना दिसली. साहजिक नर्गिस मीडियापासून चेहरा का लपवतेयं, हे कोडे अनेकांना पडले. याबद्दल खुद्द नर्गिसला विचारण्यात आले तेव्हा तिने यामागचे रहस्य सांगितलेच. होय, मी त्यादिवशी विमानतळावर माझा चेहरा लपवला, हे खरे आहे. पण असे पहिल्यांदा घडलेले नव्हते. मी  विमानतळावर अशीच जाते. स्कार्प ओढणे मला आवडते, असे नर्गिस म्हणाली. अर्थात मीडियाच्या नजरांपासून स्वत:ला वाचवण्यासाठीच नर्गिस स्कार्प ओढते, आता हे सांगणे नकोच..