Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ नील नितीन मुकेशने उरकला साखरपुडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 12:14 IST

सुविख्यात गायक दिवंगत मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. मंगळवारी दस-याच्या शुभमुहूर्तावर ...

सुविख्यात गायक दिवंगत मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नील नितीन मुकेश लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. मंगळवारी दस-याच्या शुभमुहूर्तावर जुहू येथील एका हॉटेलमध्ये नीलचा मुंबईच्याच रुक्मिणी सहाय हिच्याशी साखरपुडा पार पडला. पुढील वर्षी दोघेही लग्नबंधनात अडकरणार आहेत. ३४ वर्षीय नील आणि २७ वर्षीय रूक्मिणी यांच्या कुटुंबांचे परस्परांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दोघांच्याही कुटुंबीयांनी ठरवून हा विवाह योग जुळवून आणला.दस-याच्या शुभममुर्हूतावर झालेल्या या साखरपुड्याला नील व रुक्मिणीचे कुटुंबीय आणि खास मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी नील काळा व मरून रंगाच्या शेरवानीत उठून दिसत होता. तर रुक्मिणीने निळा व गुलाबी रंगाचे काँबिनेशन असलेला पारंपारिक लेहंगा परिधान केला होता.  मुलाच्या साखरपुड्यानंतर नीलचे वडील, गायक नितीन मुकेश, खूप आनंदी आणि उत्साही असून आपल्या होणा-या सुनेने, रुक्मिणीने आधीच आम्हा सर्वांची मने जिंकली आहेत, असे ते म्हणाले.