Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्रीने मनोज बाजपेयीशी केलं दुसरं लग्न, लग्नानंतर जगतेय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 13:08 IST

शेवटची ती अ‍ॅसिड फॅक्टरी सिनेमात दिसली होती.

विधु विनोद चोप्रा हे 'करीब' सिनेमासाठी एक नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. निरागस चेहऱ्याच्या नेहाला बघितल्यानंतर त्यांचा हा शोध थांबला. नेहाने 'करीब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर होगी प्यार की जीत, फिजा, राहुल, आत्मा अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली.

लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी असून तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर नेहा अनेकवेळा मनोजच्या सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला त्याच्यासोबत दिसते.

शेवटची नेहा अ‍ॅसिड फॅक्टरी सिनेमाचत दिसली होती. मनोज बाजपेयीचे हे दुसरे लग्न आहे. मनोज बाजपेयीचे दिल्लीतल्या एका मुलीशी लग्न झाले होते पण स्ट्रगलिंगच्या दिवसात त्यांचा घटस्फोट झाला.

नेहाचा जन्म एका मुस्लिम घरात झाला आहे. तिेचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते.

टॅग्स :मनोज वाजपेयी