Join us

नेहा कक्करचे तिच्या सासरी झाले जंगी स्वागत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By गीतांजली | Updated: October 26, 2020 17:49 IST

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आता पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगची पत्नी झाली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आता पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगची पत्नी झाली आहे. नेहाच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. 24 ऑक्टोबर रोजी फायनली नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो समोर आले होते, त्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. लग्नाला नेहाचे कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. 

नेहा आता आपल्या सासरी आणि रोहनप्रीत सिंगच्या घरी पोहोचली. रोहनच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेहाच्या सासरचे तिचं जंगी स्वागत करताना दिसतायेत. या व्हिडीओत दिसतेय की, नवीन सूनचे रोहनच्या घरी ढोल नगाडे वाजवून  स्वागत केले जात आहे, यादरम्यान नेहा आणि रोहनही नाचताना दिसत आहेत. नेहाने क्रिम कलरचा ड्रेस घातला आहे 

नेहाने तिच्या हळदीपासून संगीत सेरेमनीपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात नेहा आणि रोहनप्रीतच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत.नेहाने बॉलिवूडमध्ये आज तिने तिच्या मेहनतीने आपले एक स्थान निर्माण केले असून आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची अनेक गाणी प्रचंड गाजली.

टॅग्स :नेहा कक्कर