Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्करच्या लेंहग्याची रंगली चर्चा, प्रियंका चोप्राचे ब्राइडल लूक केले कॉपी?

By गीतांजली | Updated: October 27, 2020 12:29 IST

Neha Kakkar Wedding: बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे.

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर तिचा बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंगसोबत लग्न बंधनात अडकली आहे. दोघांनी शनिवारी 24 ऑक्टोबरला गुरुव्दारामध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतायेत. गुरुव्दारेमध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी संध्याकाळी ग्रँड सेलिब्रेशन केले. ज्यात कुटुंबातले लोक आणि मित्र परिवार सामील झाला होता.  आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते नेहाच्या लग्नाच्या आऊटफिट आणि फोटोंमधील तिच्या पोजने. 24 ऑक्टोबर रोजी तिच्या लग्नात नेहा कक्करने दोन अतिशय सुंदर आऊटफिट्स परिधान केले होते 

 

 

 नेहाने लग्नाच्या रिसेप्शनमधील परिधान केलेल्या लेंहग्याची प्रेरणा प्रियंका चोप्राकडून घेतली होती. नेहाने लाल रंगाचा रॉयल लेंहगा परिधान केला होता, जो अगदी सेम प्रियंका चोप्राच्या लेंहग्या सारखा होता. प्रियंकाने चोप्राने आपल्या लग्नात प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने तयार केलेला लाल रंगाचा लेंहगा परिधान केला होता. नेहा कक्करचा हा लेंहगा प्रियंकाशी मिळता जुळता होता. 

आता नेहाने खरचं प्रियंका चोप्राला कॉपी केले होते की नाही ते तिचं जाणते. पण नेहा लग्नात खूपच सुंदर दिसत होती हे आपण नक्कीच म्हणून शकतो. नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंत पडत आहेत. 

 

टॅग्स :नेहा कक्करअनुष्का शर्माप्रियंका चोप्रा