Join us
Daily Top 2Weekly Top 5

आधी पोस्ट केली मग डिलीट केली; आता घटस्फोटाच्या चर्चांवर नेहा कक्कर म्हणते- "माझा नवरा आणि कुटुंबाला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 09:29 IST

नेहा कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत काम आणि रिलेशनशिपमधून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळाने तिने ती पोस्ट डिलीटही केली होती. मात्र तिच्या या पोस्टमुळे नेहा कक्करच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता नेहा कक्करने स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कर तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. नेहा कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत काम आणि रिलेशनशिपमधून ब्रेक घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळाने तिने ती पोस्ट डिलीटही केली होती. मात्र तिच्या या पोस्टमुळे नेहा कक्करच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता नेहा कक्करने स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. 

नेहाने पुन्हा इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, "कृपया माझा नवरा आणि माझ्या कुटुंबाला यामध्ये खेचू नका. ती खूप चांगली माणसं आहेत आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. पण निश्चितच मी काही अन्य व्यक्ती आणि सिस्टिममुळे नाराज आहे. मला आशा आहे की तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवाल आणि माझा नवरा किंवा कुटुंबाला यापासून दूर ठेवाल. सोशल मीडियावर पोस्ट करताना मला इतकं भावनिक व्हायला नको होतं. कारणा मीडियाला राईचा पर्वत कसं करायचं हे माहीत आहे. पण मी यातून आता शिकले आहे". 

"आता मी सोशल मीडियावर माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही. बिचारी इमोशनल नेहू या जगासाठी खूप इमोशनल फूल आहे. तुम्ही चिंता करू नका. मी लवकरच परत येईन", असंही तिने पुढे म्हटलं आहे. नेहा कक्करने २०२० मध्ये रोहनप्रीतसोबत लग्न करत संसार थाटला आहे. 

टॅग्स :नेहा कक्करसेलिब्रिटी